गडहिंग्लज परिसर बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:21+5:302021-02-11T04:25:21+5:30
गडहिंग्लज : केंद्रीय मानव संसाधन व शिक्षण मंत्रालयातंर्गत ३ ते ९ फेब्रुवारी असा ‘इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल’ सप्ताहाचे आयोजन करण्यात ...
गडहिंग्लज : केंद्रीय मानव संसाधन व शिक्षण मंत्रालयातंर्गत ३ ते ९ फेब्रुवारी असा ‘इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन रुरल पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नवीन संशोधन व संकल्प विकास आणि स्टार्ट अपला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने हा उपक्रम राबविला आहे. उपक्रमांतर्गत आयोजित सप्ताहामध्ये देशभरातील तज्ज्ञांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई विभागातील १९ पदविका, पदवी, संशोधन संस्थाच्या १७०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत डॉ. रायकर, डॉ. सचिन लोकापुरे, सचिन कुंभोजे, अशोक पत्तार, बसवराज आवटे, सूर्यकांत दिडमिसे, माधव शेळके यांनी मार्गदर्शन केले.
यापुढेही स्टार्टअप विक, स्टार्टअप यात्रा, हॅकलॉनसारखे उपक्रम संस्थेत राबविले जाणार आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी केले. याकामी रोहिणी पाटील, राजेंद्र मोरे, संतोष गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.
--------------------------
२) घाळी महाविद्यालयात पाणथळ दिन
गडहिंग्लज : येथील घाळी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभागातर्फे जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील होते.
याप्रसंगी डॉ. आर. एस. सावंत यांनी जैवविविधता व पाणथळ जागा याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. एस. ए. मस्ती, स्नेहा पाटील, माधुरी देवार्डे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
संतोष बाबर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नीलेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले. अश्विन गोडघाटे यांनी आभार मानले.