गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:25+5:302021-07-08T04:16:25+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले निवेदन येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना शिष्टमंडळाने भेटून देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, ...

Gadhinglaj city NCP protests fuel price hike | गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

Next

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले निवेदन येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना शिष्टमंडळाने भेटून देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अच्छे दिनऐवजी बुरे दिन आले आहेत. किंबहुना केंद्राच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागले आहेत. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

शिष्टमंडळात, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारुण सय्यद, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, किरण कदम, उदय जोशी, महेश सलवादे, उदय परीट, राहुल शिरकोळे, अमर मांगले, रफिक पटेल, सुनीता नाईक, ऊर्मिला जोशी, मनीषा तेली आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होतो.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे. या वेळी सिद्धार्थ बन्ने, किरण कदम, उदय जोशी, हारुण सय्यद, राहुल शिरकोळे, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, शर्मिला पोतदार आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : ०७०७२०२१-गड-०२

Web Title: Gadhinglaj city NCP protests fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.