गडहिंग्लज परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:18+5:302021-07-07T04:30:18+5:30

गडहिंग्लज : हिरलगे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन देसाई यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या गडहिंग्लज तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली. परिषदेचे संस्थापक ...

Gadhinglaj Complex | गडहिंग्लज परिसर

गडहिंग्लज परिसर

Next

गडहिंग्लज : हिरलगे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन देसाई यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या गडहिंग्लज तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, सदस्य संजय कांबळे यांनी निवडीचे पत्र दिले.

सचिन देसाई : ०६०७२०२१-गड-०४

---------------------

२) गडहिंग्लजमध्ये मान्यवरांचा सत्कार

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, माजी प्राचार्य नीळकंठ ठाकूर (उत्तूर), विजय गुरबे (बटकणंगले), शिवाजी कांबळे (बुगडीकट्टी), संजय थोरात (नूल), संजय देसाई (गिजवणे), शरद पाटील (आर्दाळ), वैजनाथ पालेकर (गडहिंग्लज), परशुराम हरेर व बजरंग गरूड (गडहिंग्लज) यांचा सत्कार झाला. यावेळी दादासाहेब लाड, सदाशिव देसाई, कैलास सुतार, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

------------------------

३) शमनजी महाविद्यालयातर्फे डॉक्टरांचा सन्मान

गडहिंग्लज : बहिरेवाडी येथील रियाजभाई शमनजी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व रोशनबी शमनजी नर्सिंग महाविद्यालयातर्फे कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रियाज शमनजी यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, नंदकुमार पाटील यांचा सत्कार झाला. यावेळी सचिव लक्ष्मण कंग्राळकर, डॉ. उल्का गोरूले, सुलोचना रेडेकर, प्राचार्य शफी अहमद, प्राचार्य मुरलीधर माळी आदी उपस्थित होते.

------------------------

४) परमेश्वरी पाटील यांची निवड

गडहिंग्लज : लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथील सरपंच अ‍ॅड. परमेश्वरी राजशेखर पाटील यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या गडहिंग्लज तालुका विधी व न्याय प्रमुखपदी निवड करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील-कुर्डूकर व राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

फोटो : परमेश्वरी पाटील : ०६०७२०२१-गड-०५

Web Title: Gadhinglaj Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.