गडहिंग्लज शहरातील अनधिकृत डिजीटल बोर्ड हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:13 PM2020-12-23T17:13:23+5:302020-12-23T17:14:56+5:30

गडहिंग्लज :प्लॅस्टिकबंदी पाठोपाठ शहर डिजीटल फलकमुक्त करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज शहरातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे लावलेले ...

Gadhinglaj deleted unauthorized digital boards in the city | गडहिंग्लज शहरातील अनधिकृत डिजीटल बोर्ड हटवले

 गडहिंग्लज नगरपालिकेने शहरातील अनधिकृतडिजीटल फलक हटविले. (किल्लेदार फोटो)

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लज शहरातील अनधिकृत डिजीटल बोर्ड हटवले नगरपालिकेची कारवाई : एका दिवसात १६ फलक काढले

गडहिंग्लज :प्लॅस्टिकबंदी पाठोपाठ शहर डिजीटल फलकमुक्त करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज शहरातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे लावलेले १६ मोठे डिजीटल फलक हटविण्यात आले.

नगरपालिकेच्या इमारतीसह कांही खाजगी इमारतींवर जाहीरातीसाठी डिजीटल फलक लावण्यास रितसर परवानगी देण्यात आली आहे. ती ठिकाणे वगळता अन्य ठिकाणी डिजीटल फलक लावण्यासाठी पालिकेच्या पूर्व परवानगीची गरज आहे. परंतु, बसस्थानकासमोरील दसरा चौक, आजरा रोड, कडगाव रोड, चर्च रोड, संकेश्वर रोड या परिसरात अनेक ठिकाणी कांही शैक्षणिक व सहकारी संस्था, खाजगी क्लासेस व जीम चालकांनी मोठ-मोठे डिजीटल फलक अनधिकृतरित्या लावले होते.

अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या डिजीटल फलकामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे.

मोठ्या फलकांशिवाय आणखी कांही लहान आकाराचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तेही येत्या दोन दिवसात हटविण्यात येणार आहेत. या मोहिमेत अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र जाधव, शामराव वडर, सौरभ लाखे, आकाश सोनटक्के, प्रल्हाद लाखे व निखील बारामती आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.


 

Web Title: Gadhinglaj deleted unauthorized digital boards in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.