गडहिंग्लज विभागात ओढे-नाले मुक्तीची मोहीम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:15+5:302021-09-16T04:30:15+5:30
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, ...
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, पंचायत समिती सदस्य विजयराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वाघमोडे म्हणाले, उपविभागीय स्तरावरील सर्व विषय मार्गी लावून लवकरच पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊनच आराखडा बनविला जाईल. पुनर्वसनात कोणावरही अन्याय होणार नाही. संपत देसाई म्हणाले, वारंवार उद्भवणारी पूरपरिस्थिती आणि पुनर्वसनासाठीच आपली लढाई सुरू आहे. वरून येणाऱ्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने आपला आराखडा तयार ठेवावा, धोरणात्मक निर्णयासाठी संघटनेतर्फे पाठपुरावा केला जाईल. तहसीलदार पारगे, गटविकास अधिकारी मगर, रमजान अत्तार यांचीही भाषणे झाली. अजित बंदी यांनी प्रास्ताविक केले. वसंत नाईक यांनी आभार मानले. बैठकीस उपसरपंच राजू चौगुले, माजी सभापती विजयराव पाटील, अनिकेत कोणकेरी, अमर पाटील, मल्लाप्पा चौगुले, राजू आंबी, बाळासाहेब रेगडे, ग्रामसेवक राजाराम घेवडे, मंडल अधिकारी आप्पा कोळी, तलाठी प्रल्हाद खटावकर, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित पूरग्रस्तांच्या बैठकीत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच राजू चौगुले, कॉ. संपत देसाई, दिनेश पारगे, शरद मगर, रमजान अत्तार, विजयराव पाटील, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५०९२०२१-गड-०८