गडहिंग्लज कारखाना ऑक्सिजन निर्मिती करण्यास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:39+5:302021-05-11T04:25:39+5:30
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी विभागाकडील ओझोन युनिटमधून ऑक्सिजन निर्मिती ...
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी विभागाकडील ओझोन युनिटमधून ऑक्सिजन निर्मिती करण्यास आपण तयार आहोत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे आणि उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, कारखान्याच्या डिस्टीलरी विभागाकडील ओझोन प्लँटमधून इंडस्ट्रीअल ऑक्सिजनची निर्मिती करणे शक्य आहे. त्याची शुद्धता ९३ टक्क्यांपर्यंत असून प्रतिदिनी १० ते १२ सिलेंडर ऑक्सिजन शासनाला पुरवठा करता येईल. त्यासाठी कनर्व्हेशन सिस्टीम, फिलिंग पॉईंट व सिलेंडर इत्यादीसाठी कारखान्याला काही खर्च करावा लागणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य मिळाल्यास कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करून आपत्कालीन परिस्थितीत शासनाला मोफत ऑक्सिजन पुरवठा करता येईल, असेही स्पष्ट केले आहे.