गडहिंग्लज कारखान्याने ब्रिस्कला २४ कोटी ६५ लाख द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 PM2021-06-01T16:08:46+5:302021-06-01T16:11:55+5:30
Sugar factory Kolhapur : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रूपये द्यावेत, असा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव अरविंदकुमार यांनी दिला आहे. आदेशापासून तीन महिन्यात म्हणजेच २१ आॅगस्ट २०२१ पर्यंत ही रक्कम द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रूपये द्यावेत, असा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव अरविंदकुमार यांनी दिला आहे. आदेशापासून तीन महिन्यात म्हणजेच २१ आॅगस्ट २०२१ पर्यंत ही रक्कम द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
२०१४ पासून ब्रिस्कने सहयोग तत्वावर १० वर्षांसाठी हा कारखाना चालवायला घेतला होता. परंतु, मुदतीपूर्वीच यावर्षी हंगामाच्या अखेरीस यापुढे कारखाना चालविणार नसल्याचे कंपनीने शासनाला कळविले होते. त्यानुसार सहकार विभागाच्या समितीने ९ एप्रिलला हा कारखाना कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.
दरम्यान, कंपनी व कारखाना यांच्यातील येणी-देणीसंदर्भात अरविंदकुमार यांच्यासमोरच सुनावणी झाली होती. त्याबाबतचा त्यांनी हा आदेश दिला आहे. साखर आयुक्तांनी ही रक्कम कारखान्याकडून वसूल करून कंपनीला ुद्यावयाची आहे.
मुदतीत रक्कम न दिल्यास कारखान्याने कंपनीला ८ टक्के व्याज द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कारखाना चालविण्यास संचालक मंडळ असमर्थ ठरल्यास कारखाना चालवायला घेणाऱ्या कंपनीने ह्यब्रिस्कह्णच्या देय रक्कमेची पूर्तता करावी, अशी अटदेखील आदेशात घालण्यात आली आहे.
कारखान्याने कंपनीला द्यावयाची रक्कम
कंपनी व कारखाना दरम्यानच्या करारात सभासदांना १० किलो साखर देण्याचे नमूद होते. परंतु, संचालकांच्या मागणीनुसार कंपनीने उत्पादकाला वर्षाला १०० किलो तर अनुत्पादकाला ५० किलो साखर दिली आहे. करारात नसतानाही दिलेल्या साखरेपोटी कंपनीचा ९ कोटी १७ लाख जादा खर्च द्यावा.
- करारात नसतानाही कंपनीने भागवलेले युनियन बँक व स्टेट बँकेचे मिळून ७ कोटी ९१ लाख द्यावेत.
- प्रदूषण नियंत्रणासाठी कंपनीने केलेला ८ कोटी ८२ लाख खर्च द्यावा.
- करारानुसार कंपनीने कारखान्याला व्यवस्थापन खर्चापोटी १ कोटी २५ लाख रूपये द्यावेत.
कंपनीच्या या मागण्या फेटाळल्या
कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कंपनीने केलेल्या ९ कोटी ३७ लाखाचा खर्च आणि कामगारांच्या वाढीव पगारापोटी जादा खर्च केलेल्या १ कोटीची कंपनीची मागणी फेटाळ्यात आली.
४ जूनच्या बैठकीत निर्णय
सहकार सचिवांचा आदेश आणि कारखाना सुरू करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (४ जूनला) बोलविण्यात आली आहे. या बैठकीकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.