गडहिंग्लजला 'इंटेन्ट'तर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:11+5:302021-06-21T04:18:11+5:30
इंम्पल्स अकॅडमीच्या सहयोगातून येथे सुरू झालेल्या इंटेन्ट करिअर अकॅडमीतर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव व पालक संवाद कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी ...
इंम्पल्स अकॅडमीच्या सहयोगातून येथे सुरू झालेल्या इंटेन्ट करिअर अकॅडमीतर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव व पालक संवाद कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी अकॅडमीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
अकॅडमीचे संचालक व समुपदेशक रंगा शिंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य जी. एस. शिंदे, प्राचार्य एस. एन. देसाई, प्राचार्य डी. व्ही. पाटील यांच्यासह ३८ विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
शिंगटे म्हणाले, नवे जग निर्माण करणारे नेतृत्व घडविण्याची क्षमता असणारे युवक घडविणे हाच अकॅडमीचा उद्देश आहे.
चौगुले म्हणाले, जेईई, एनईईटी व 'आयआयटी'च्या तयारीसाठी गडहिंग्लज परिसरातील विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागू नये म्हणूनच ही अकॅडमी सुरू केली आहे.
प्रा. सत्यनारायण राव यांनी अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्स व अभ्यासक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमास महेश मजती, ममता मजती, प्रा. रामानंजय, कृतिका शेट्टी, रोहन शेट्टी, सुधा राव आदींसह पालक उपस्थित होते.
प्राचार्या मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक केले. रेखा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक गौरी बेळगुद्री यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्राचार्या मीना रिंगणे यांच्याहस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. डावीकडून रंगा शिंगटे, एम. एल. चौगुले, रामानंजय, रोहन शेट्टी उपस्थित होते.
क्रमांक : २००६२०२१-गड-०२