गडहिंग्लज पालिकेच्या पुरस्कारांचे मंगळवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:34+5:302020-12-30T04:33:34+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (दि. ५ जानेवारी) सायंकाळी ६.३० वाजता पालिकेच्या प्रांगणात होणार ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (दि. ५ जानेवारी) सायंकाळी ६.३० वाजता पालिकेच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.
कोरी म्हणाल्या, गेल्या ४१ वर्षांपासून नगरपालिकेच्या पूज्य साने गुरुजी वाचनालयातर्फे लोकशिक्षण व्याख्यानमाला चालवली जाते. तसेच वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय डॉ. नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार व साने गुरुजी साहित्य पुरस्कार, आदर्श शिक्षक व आदर्श वाचक पुरस्काराचे वितरणही या व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात केले जाते.
तथापि, कोरोनामुळे यावर्षी पुरस्कार वितरण व व्याख्यान असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
-----------------------------------------
* गणेश देवी यांचे व्याख्यान
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ, संशोधक व पुरोगामी विचारवंत पद्मश्री डॉ. गणेशदेवी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. त्यानंतर ‘आजचे वर्तमान’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
-----------------------------------------
* गणेश देवी : २९१२२०२०-गड-१९