गडहिंग्लज नगरपालिकेला दुसऱ्यांदा 'ओडीएफ प्लस प्लस' मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:21+5:302021-03-20T04:23:21+5:30

आठवड्यापूर्वी ‘ओडीएफ प्लस प्लस’ दर्जाच्या तपासणीसाठी केंद्रीय समितीने शहराची पाहणी केली. ‘क’ वर्ग नगरपालिका गटातील पालिकांमध्ये जिल्ह्यात केवळ गडहिंग्लजमध्येच ...

Gadhinglaj Municipality has been given 'ODF Plus Plus' rating for the second time | गडहिंग्लज नगरपालिकेला दुसऱ्यांदा 'ओडीएफ प्लस प्लस' मानांकन

गडहिंग्लज नगरपालिकेला दुसऱ्यांदा 'ओडीएफ प्लस प्लस' मानांकन

Next

आठवड्यापूर्वी ‘ओडीएफ प्लस प्लस’ दर्जाच्या तपासणीसाठी केंद्रीय समितीने शहराची पाहणी केली. ‘क’ वर्ग नगरपालिका गटातील पालिकांमध्ये जिल्ह्यात केवळ गडहिंग्लजमध्येच मैला प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. त्याच्यासह शहरातील सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक जागा व नदीघाटाची पाहणी करून हा दर्जा देण्यात आला आहे.

याकामी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, स्वच्छता अभियंता अनिल गंदमवाड, करनिर्धारण अधिकारी अवंती पाटील, शहर समन्वय मंथन शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

----

* सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, व नागरिक यांच्या सहकार्यामुळेच नगरपालिकेला सलग दुसऱ्यांदा हे मानांकन मिळाले आहे. यापुढेही शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

- स्वाती कोरी, नगराध्यक्षा गडहिंग्लज.

------------------------------

* गडहिंग्लज पालिका फोटो : १९०३२०२१-गड-०५

Web Title: Gadhinglaj Municipality has been given 'ODF Plus Plus' rating for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.