गडहिंग्लज पालिकेने मराठा समाजासाठी सांस्कृतिक हॉल द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:25+5:302021-03-31T04:25:25+5:30
शहरातील मराठा समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधून द्यावा, अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना ...
शहरातील मराठा समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधून द्यावा, अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, मराठा समाजातील आर्थिक मागास असलेल्या कुटुंबांना सांस्कृतिक, कौटुंबिक समारंभ करावयास झाल्यास त्यांना मंगल कार्यालये भाड्याने घेणे परवडत नाही. त्यांना नाईलाजाने कार्यक्रम रद्द करावा लागतो किंवा कर्ज काढून समारंभ करावा लागतो. त्यामुळे त्यांची होणारी कुचंबणा दूर करावी.
पालिकेने मराठा समाजासाठी मुलींचे हायस्कूलजवळच्या खुल्या जागेत किंवा कडगाव रोडवरील वीजवितरण कार्यालयाजवळच्या जागेत सांस्कृतिक सभागृह बांधून द्यावे.
निवेदनावर संतोष चौगुले, चेतन कातकर, साईनाथ लोंढे, संग्राम आसबे, विनायक कंगुरे, संतोष बरगे, उत्तम दळवी, सुशांत विचारे, विनायक सुतार, गणेश अजगर, उमेश मांगले, संतोष मांगले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.