गडहिंग्लज बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:13+5:302021-05-06T04:24:13+5:30
गडहिंग्लज : बंगालमध्ये निवडणुकीनंतर तृणमूलकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी येथील दसरा चौकात ...
गडहिंग्लज : बंगालमध्ये निवडणुकीनंतर तृणमूलकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी येथील दसरा चौकात निदर्शने केली.
निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची घरे जाळण्यात आली. महिलांना मारहाण व धमकावण्याचे प्रकार घडले. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
आंदोलनात शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, अनिल खोत, संदीप नाथबुवा, प्रीतम कापसे, शिवमूर्ती पाटील, दिगंबर विटेकरी, आदी सहभागी झाले होते.
-------
सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गिजवणे येथे साहित्य वाटप
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतर्फे को-मॉर्बिड सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरपंच पौर्णिमा कांबळे यांच्या हस्ते अत्यावश्यक साहित्याचे वितरण झाले.
गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल आणि को-मॉर्बिड नागरिकांच्या तपासणीसाठी १६ पथके कार्यरत आहेत. त्यांतील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज, थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर देण्यात आले.
यावेळी उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य भूषण गायकवाड, लक्ष्मण शिंदे, ग्रामसेवक डी. बी. कुंभार, अमित दळवी, संतोष चव्हाण, पांडुरंग बरकाळे, महादेव कुंभार, आदी उपस्थित होते.