गडहिंग्लज पानपट्टी असोसिएशनतर्फे जळीतग्रस्ताला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:14+5:302021-05-01T04:22:14+5:30

गडहिंग्लज पानपट्टी असोसिएशनतर्फे शहरातील जळीतग्रस्त शमुद्दीन चाँद यांना ७५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. शहरातील सुभाष चित्र मंदिरानजीक असणाऱ्या ...

Gadhinglaj Panpatti Association helps the burnt victims | गडहिंग्लज पानपट्टी असोसिएशनतर्फे जळीतग्रस्ताला मदत

गडहिंग्लज पानपट्टी असोसिएशनतर्फे जळीतग्रस्ताला मदत

googlenewsNext

गडहिंग्लज पानपट्टी असोसिएशनतर्फे शहरातील जळीतग्रस्त शमुद्दीन चाँद यांना ७५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

शहरातील सुभाष चित्र मंदिरानजीक असणाऱ्या चाँद यांची पानपट्टी अचानक लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडली आहे. यामध्ये त्यांचे ७५ हजारांहून अधिक नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे ठप्प झालेला व्यवसाय आणि ज्याच्यावर पोट चालायचे, ती पानपट्टीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने चाँद यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत म्हणून असोसिएशनतर्फे ५ हजार, भैरू गंधवाले, विजय भदरगे, एम. बी. दळवी यांनी प्रत्येकी ५००, तर अल्लाबक्ष सय्यद यांनी १ हजाराची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष भैरू गंधवाले, उपाध्यक्ष विजय भदरगे, सचिव वसंत शेटके, खजिनदार मारुती खोत, अस्लम बेडसूर, नितीन मोहिते, बाळू कुंभार, प्रकाश पाटील, एम. बी. दळवी, तानाजी देवार्डे, आप्पा पाटील, अरुण आळगुंडे, सुभाष देवेकर आदी उपस्थित होते.

--------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे पानपट्टी असोसिएशनतर्फे जळीतग्रस्त शमुद्दीन चाँद यांना आर्थिक मदत देताना वसंत शेटके, अल्लाबक्ष सय्यद, भैरू गंधवाले, विजय भदरगे आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : ३००४२०२१-गड-०४

Web Title: Gadhinglaj Panpatti Association helps the burnt victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.