वीज बिल थकबाकीमुक्तीचा गडहिंग्लज पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:15+5:302021-04-02T04:25:15+5:30

कोल्हापूर : गावाने ठरविले तर तोच एक पॅटर्न होऊन जातो हे तब्बल ३६ गावे थकबाकीमुक्त करून दाखवत गडहिंग्लज ...

Gadhinglaj pattern of electricity bill arrears | वीज बिल थकबाकीमुक्तीचा गडहिंग्लज पॅटर्न

वीज बिल थकबाकीमुक्तीचा गडहिंग्लज पॅटर्न

Next

कोल्हापूर : गावाने ठरविले तर तोच एक पॅटर्न होऊन जातो हे तब्बल ३६ गावे थकबाकीमुक्त करून दाखवत गडहिंग्लज विभागाने दाखवून दिले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विभागानेही सात गावे थकबाकीमुक्त करत या पॅटर्नमध्ये आपलेही योगदान दिले आहे. या महिनाभरात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ४४ गावे थकबाकीचा शिक्का पुसण्यात यशस्वी झाली आहेत.

वाढलेल्या थकबाकीमुळे आर्थिक संकटाच्या खाईत लोटलेल्या महावितरणने गावोगावी जाऊन वीज बिले भरण्याचे आवाहन केले होते. याला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज विभागाने सुरुवातीपासून खूपच चांगला प्रतिसाद दिला. गेल्या पंधरवड्यात तीन गावांपासून सुरुवात झालेल्या या पॅटर्नने अवघ्या १५ दिवसांत ३६ वर झेप घेतली.

कोल्हापूर परिमंडळांतर्गत ४४ गावे थकबाकीमुक्त झाली. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ गावे आहेत आणि ती सर्व आजरा, चंदगड व गडहिंग्लज या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या विभागातील आहेत. यात आजऱ्यातील १४, चंदगडमधील १२ व गडहिंग्लजमधील १० गावे आहेत. या गावातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील १७६९ ग्राहकांनी २० लाख १७ हजार रुपये थकबाकीचा भरणा केला आहे. गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता दयानंद कमतगी (आजरा), विशाल लोधी (चंदगड), संदीप दंडवते (नेसरी), सागर दांगट (गडहिंग्लज) यांनी कामकाज पाहिले.

चौकट ०१

गडहिंग्लज विभाग

आजरा: चिमणे, झुलपेवाडी, करपेवाडी, हालेवाडी, होन्याळी, बेलेवाडी, महागोंडवाडी, चव्हाणवाडी, पेंढारवाडी, कागिनवाडी, हंदेवाडी, दर्डेवाडी, माद्याळ, मेढेवाडी

चंदगड : शेवाळे, खामदळे, शिरोली, सत्तेवाडी, मोरेवाडी, मलगेवाडी, विंझणे, बोंजुर्डी, अलबादेवी, उत्साळी, महिपाळगड, मुरकुटेवाडी

गडहिंग्लज : हासूर सासगिरी, वैरागवाडी, सावंतवाडी, जांभुळवाडी, हेळेवाडी, लिंगनूर, दुगूनवाडी, तारेवाडी, चंदनकुड, उंबरवाडी

चौकट ०२

करवीर तालुक्यातील निटवडे पहिले थकबाकीमुक्त गाव

कदमवाडी उपविभागातील आंबेवाडी शाखेंतर्गतचे निटवडे (ता. करवीर) या गावातील १२० ग्राहकांनी पाच लाख रुपये भरणा केल्याने हे पहिले गाव थकबाकीमुक्त ठरले आहे.

सांगलीतील मांगले हे पहिले थकबाकीमुक्त शाखा कार्यालय

महावितरणच्या इस्लामपूर विभागातील शिराळा उपविभागांतर्गत असलेल्या मांगले (ता. शिराळा) शाखा कार्यालयाने कार्यक्षेत्रातील मांगलेसह देववाडी, लादेवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, चिमटेवाडी व पवारवाडी या सात गावांतील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक १५८४ ग्राहकांनी ५६ लाख ७९ हजार रुपयांचे बिल भरले.

Web Title: Gadhinglaj pattern of electricity bill arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.