गडहिंग्लज विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:51+5:302021-06-16T04:32:51+5:30
गडहिंग्लज : येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाचे प्राचार्य साताप्पा कांबळे हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनिमित्त कोविड रुग्णांसाठी मोफत भोजन ...
गडहिंग्लज : येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाचे प्राचार्य साताप्पा कांबळे हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनिमित्त कोविड रुग्णांसाठी मोफत भोजन बनवून देणाऱ्या रिंगणे कुटुंबीयांना ५ हजारांची आर्थिक मदत दिली. या वेळी संदीप रिंगणे, रमजान अत्तार, बाळासाहेब पोतदार, गणपतराव पाटोळे आदी उपस्थित होते.
---------------------
२) आजऱ्यात जालकर, जगदाळेंचा सत्कार
गडहिंग्लज : आजरा येथील पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. पी. एम. जालकर, सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांचा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, डॉ. पी. डी. ढेकळे यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी आशिषे टेकाळे, विराज वाघ, वर्षाराणी पाटील, पंकज सोनवणे, विजयकुमार कडलगे, सुनील ढोकरे, दाऊत मुल्लाणी आदी उपस्थित होते.
---------------------
३) गडहिंग्लजमध्ये टोककणी यंत्र वाटप
गडहिंग्लज : कृषी विभागातर्फे तालुक्यातील कडगाव, जखेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांना टोककणी यंत्र वितरित करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी हरिदास बोंगे, कृषी पर्यवेक्षक ए. जे. खोत, कृषी सहाय्यक के. व्ही. मोर्ती आदी उपस्थित होते. भात, सोयाबीन, भूईमूग, मका व तूर टोकणणीसाठी हे यंत्र उपयुक्त असून चार मजुरांचे काम या एका मशीनद्वारे करता येते.
------------------------
४) देवर्डे येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : देवर्डे (ता. आजरा) येथे ग्रा. पं. नूतन पदाधिकाऱ्यांचा प्राथमिक शाळा व श्री. रवळनाथ हायस्कूलतर्फे सत्कार झाला. अध्यक्षस्थानी केशव पाटील होते. मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी स्वागत केले. सरपंच गंगाधर पाटील, उपसरपंच संगीता चाळके यांच्यासह ग्रा. प. सदस्यांचा मुख्याध्यापक नामदेव माईनकर, संयोगिता सुतार, चंद्रकांत घुरे यांच्याहस्ते सत्कार झाला.
-------------------------
५) भादवणला सेना कार्यालयाचे उद्घाटन
गडहिंग्लज : भादवण (ता. आजरा) येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपतालुकाप्रमुख व सरपंच संजय पाटील, उपजिल्हा संघटक संभाजी पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
--------------------------
६) उत्तूरला शुक्रवारी रक्तदान शिबिर
उत्तूर : येथील हेल्पिंग हॅण्ड ग्रुपतर्फे शुक्रवार (दि. १८) कन्या विद्यामंदिरमध्ये रक्तदान शिबिर व कोविड योद्ध्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे. १८ ते ४५ वयोगटातील रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहनही ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.