गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:56+5:302021-05-23T04:22:56+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा करणार आहोत, तसेच सीटी स्कॅन मशीनसह आणखी एक ऑक्सिजन ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २०० बेडची सुविधा करणार आहोत, तसेच सीटी स्कॅन मशीनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयाला २५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन भेट देण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे व प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुपुर्द करण्यात आले.
यावेळी नगरसेवक हारुण सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, शहराध्यक्ष गुंड्या पाटील, आदी उपस्थित होते.
मुश्रीफ फौंडेशनचे आभार !
ऑक्सिजन बेडची टंचाई लक्षात घेऊन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे ‘सीपीआर’सह जिल्ह्यातील कोविड दवाखान्यांना १०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन्स दिली आहेत. त्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचे आभार. तब्बल ७५ लाखांच्या या मशीन्समुळे रुग्णांची ऑक्सिजनसाठी होणारी हेळसांड थांबण्यास मदत होईल, असे
जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळी- २२गड
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे व डॉ. चंद्रकांत खोत यांच्याकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन सुपुर्द करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, आदी उपस्थित होते.