"गडहिंग्लज कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही", अ‍ॅड. श्रीपतराव शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:46 PM2021-12-20T19:46:57+5:302021-12-20T19:57:28+5:30

दिवंगत आप्पासाहेब नलवडे व सहका-यांनी जिद्दीने उभारलेला गडहिंग्लज साखर कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी तो कदापीही बंद पडू देणार नाही.

Gadhinglaj Sugar Factory Boiler Ceremony | "गडहिंग्लज कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही", अ‍ॅड. श्रीपतराव शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

"गडहिंग्लज कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही", अ‍ॅड. श्रीपतराव शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

गडहिंग्लज : दिवंगत आप्पासाहेब नलवडे व सहका-यांनी जिद्दीने उभारलेला गडहिंग्लज साखर कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी तो कदापीही बंद पडू देणार नाही. कामगार, शेतकरी आणि सहानुभूतीदार व्यक्ती आणि संस्थांच्या इच्छाशक्तीमुळेच तो सुरू झाला आहे. आम्ही १२ संचालक तो हिमतीने यशस्वीरित्या चालवू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केला.

हरळी येथे कार्यस्थळी बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे होते. राष्ट्रवादीच्या ४ संचालकांसह शहापूरकर गटाचे ३ संचालक यावेळी अनुपस्थित होते.

शिंदे म्हणाले, आठवडाभरात गळीताला सुरूवात होईल. ह्यएफआरपीह्णप्रमाणे होणारी ऊसबीले १५ दिवसांत आणि कामगारांना ८.४४ टक्के बोनस देवू.

नलवडे म्हणाले, दुभती म्हैस रक्तबंबाळ होईपर्यंत पिळतात, तसे कारखान्याला पिळू नका, असे मी म्हणालो होतो. ते कुणाला लागले म्हणूनच कंपनीने कारखाना सोडला असेल तर त्याची आपल्याला चिंता नाही.

संचालक प्रकाश चव्हाण म्हणाले, हक्काचा कारखाना म्हणून शेतकºयांनी आपला ऊस राखून ठेवला आहे. त्यामुळे यावर्षी ३ लाख टनाचे गळीत होईल.

अमर चव्हाण म्हणाले, वयाची पर्वा न करता अध्यक्ष शिंदेंनी केलेली धडपड आणि कामगारांच्या इच्छाशक्तीमुळेच कारखाना सुरू होत आहे.

म्हणूनच कारखाना तोट्यात

शहापूरकरांनी कारखान्याच्या पैशातून इंचनाळ बंधारा व दाभेवाडीची पाणी योजना राबविली. त्यामुळेच कारखाना तोट्यात आला, असा आरोप शिंदेंनी केला.

जिल्हाधिका-यांचे अभिनंदन..!

ब्रिस्क कंपनीने कामगार न्यायालयाच्या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामुळेच सेवानिवृत्त कामगारांच्या देणीचा प्रश्न प्रलंबित आहे. म्हणूनच हा प्रश्न आपल्या अखत्यारित येत नाही, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले. त्यांचे मी अभिनंदन करतो, असेही शिंदे म्हणाले.

आजी-माजी सैनिकांकडून १० लाख

आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी कारखाना चालविण्यासाठी ठेवीच्या स्वरूपात १० लाखाची मदत केली. त्यांच्यासह सर्व ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करू, अशी ग्वाही शिंदेंनी दिली.

Web Title: Gadhinglaj Sugar Factory Boiler Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.