‘गडहिंग्लज अर्बन’ची आर्थिक स्थिती भक्कम - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:09+5:302021-06-05T04:19:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गडहिंग्लज अर्बन बँकेतील अपहाराचा कोणताही परिणाम बँक व्यवहारावर होणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम ...

Gadhinglaj Urban's financial position is strong - Hassan Mushrif | ‘गडहिंग्लज अर्बन’ची आर्थिक स्थिती भक्कम - हसन मुश्रीफ

‘गडहिंग्लज अर्बन’ची आर्थिक स्थिती भक्कम - हसन मुश्रीफ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गडहिंग्लज अर्बन बँकेतील अपहाराचा कोणताही परिणाम बँक व्यवहारावर होणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून ठेवीदारांनी चिंता करू नये, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या विभागातील लोकप्रतिनिधी म्हणून ग्राहक व ठेवीदारांच्या मागे हिमालयासारखा राहू, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, बँकेमध्ये मार्च २०२० साली गुंतवणूक समितीची मान्यता न घेताच बँकेच्या सरव्यवस्थापकाने १३ कोटी रुपये फंडामध्ये गुंतवणूक न करता ब्रोकरच्या वैयक्तिक फार्मकडे वर्ग केले. यापूर्वी अनेक दिवसापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जात होती. संबंधित ब्रोकरनी चांगला परतावाही दिल्याने विश्वास निर्माण केला होता. परंतु; यावेळी त्यांनी दुसऱ्या अकाउंटवर ब्रोकर व सरव्यवस्थापक दोघांच्या संगनमताने पैसे वर्ग केले गेले आणि त्यामुळे १३ कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे.

असा प्रकार झाला असला तरी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने ठेवीदारांनी भीती बाळगण्याची गरज नाही. आपली सर्व रक्कम बँकेत सुरक्षित आहे. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष म्हणून या बँकेच्या मागे ठामपणाने उभा आहे. कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. संचालक मंडळाचा या प्रकाराशी कोणताही संबंध नाही, असं मला पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेल आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी संबंधित दोघांनाही लवकरच अटक करून व त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे अभिवचन मला दिलेलं आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत अपहाराचे पैसे तर परत मिळवूच. त्याचबरोबर बँक आतापेक्षा अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठीही प्रयत्न करू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Gadhinglaj Urban's financial position is strong - Hassan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.