गडहिंग्लज आठवडा बाजाराची जागाच बदलायला हवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 10:19 AM2021-01-05T10:19:49+5:302021-01-05T10:22:34+5:30

Traffic Market Gadhinglaj Kolhapur- गडहिंग्लजला दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या बैठकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरातील मेन रोडसह बाजारपेठेतही बाजाराच्या दिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे भाजी-फळ विक्रेत्यांसह अन्य फिरत्या विक्रेत्यांच्या बैठकीच्या जागेची पर्यायी व्यवस्था करायला हवी. यासाठी चर्च रोड हाच एकमेव पर्याय असून शहरातील व्यापारी संघटना, पालिका व पोलिसांनी त्याचा विचार व नियोजन करण्याची गरज आहे.

Gadhinglaj week market place should be changed ..! | गडहिंग्लज आठवडा बाजाराची जागाच बदलायला हवी..!

गडहिंग्लज येथील लक्ष्मी मंदिराकडे जाणारा रस्ता रविवारीच्या आठवडा बाजारादिवशी फळे, भाजीवाला विक्रेत्यांमुळे असा कोंडून गेल्याने रहदारीसाठी बंद होतो. (मज्जीद किल्लेदार)

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतुकीची कोंडी, चर्च रोडचा पर्यायपालिका-पोलिसांनी नियोजन करावे

शिवानंद पाटील

गडहिंग्लज  : गडहिंग्लजला दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या बैठकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरातील मेन रोडसह बाजारपेठेतही बाजाराच्या दिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे भाजी-फळ विक्रेत्यांसह अन्य फिरत्या विक्रेत्यांच्या बैठकीच्या जागेची पर्यायी व्यवस्था करायला हवी. यासाठी चर्च रोड हाच एकमेव पर्याय असून शहरातील व्यापारी संघटना, पालिका व पोलिसांनी त्याचा विचार व नियोजन करण्याची गरज आहे.

सीमाभागातील एक महत्वाची बाजारपेठ म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. याठिकाणी जनावरांचाही मोठा बाजार भरतो. त्यामुळे आजरा, चंदगडसह कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी व ग्राहक गडहिंग्लजच्या बाजारात मोठ्या संख्येने येतात. आठवडा बाजारात कोट्यवधी रूपयांची उलाढाल याठिकाणी होते.

परंतु, बाजाराच्या बैठकीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे विक्रेते शहरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बसतात. त्यामुळे म. दुं. श्रेष्ठी विद्यालय ते वीरशैव बँक, वीरशैव बँक, वीरशैव बँक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते अहिल्याबाई होळकर चौक, महालक्ष्मी स्वीट मार्ट ते टिळक पथ, गंगा मेडीकल ते गुणे गल्ली, शिवाजी बँक ते कदम मेडीकल, कचेरी रोड आणि पाण्याच्या टाकीचा परिसर, साधना बुक स्टॉल ते बँक आॅफ इंडिया या रोडवर बाजार भरतो.

दर रविवारी दसरा चौक ते मुसळे कॉर्नरपर्यंतची वाहतूक बंद राहते. त्याचबरोबर बाजार भरणाºया सर्व रस्त्यांवरदेखील सायकल व दुचाकीदेखील नेता येत नाही. म्हणूनच बाजाराचे पर्यायी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

 अशी करता येईल पर्यायी व्यवस्था

शानभाग हॉस्पिटल ते कडगांव रोडवरील भगवा चौक पर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीविक्रेत्यांची व्यवस्था करता येईल. याशिवाय पोलिस ठाणे परिसर व चर्चरोडपासून दोनही बाजूला जाणाºया अंतर्गत रस्त्यांवर फळ, भाजीपाला, कापड विक्रेते, मसाले, चप्पल विक्रेते आदींसह अन्य किरकोळ विक्रेत्यांची व्यवस्था करता येईल. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.

वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था

बाजाराच्या दिवशी पोलिस परेड मैदान, बॅ. नाथ पै विद्यालय मैदान व एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर याठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था केल्यास बाजारात कोठेही वाहतुकीची कोंडी होणार नाही.

 बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनाही सोयीचे

बाजाराच्या दिवशी मुसळे कॉर्नर ते अभिरूची स्वीट मार्टपर्यंतचा रस्ता चारचाकींसाठी बंद ठेवला जातो. त्यामुळे बाहेरून चारचाकीतून येणारे प्रवाशी शहरातील कुठल्याही रोडवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेही वाहतुकींची कोंडी होते. पर्यायी व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांनाही नेहमीप्रमाणे शहरातून बाहेर पडता येईल.


 

Web Title: Gadhinglaj week market place should be changed ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.