गडहिंग्लजला सोयीचे राजकारण..आघाड्याही सोयीच्या..!

By admin | Published: February 13, 2017 11:49 PM2017-02-13T23:49:20+5:302017-02-13T23:49:20+5:30

राष्ट्रवादीचे विरोधक अडकले बालेकिल्ल्यातच : बड्याचीवाडी मतदारसंघात चौरंगी तर हलकर्णी, भडगाव, नेसरी व गिजवणे गटांत तिरंगी लढती

Gadhinglaje friendly politics. | गडहिंग्लजला सोयीचे राजकारण..आघाड्याही सोयीच्या..!

गडहिंग्लजला सोयीचे राजकारण..आघाड्याही सोयीच्या..!

Next


राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
राष्ट्रवादीला रोखणे हेच सर्वांचे ध्येय असूनही तालुक्यातील सारेच नेते नेहमीप्रमाणे स्वत:च्या बालेकिल्ल्यांच्या डागडुजीमध्येच अडकून पडले. सोयीच्या राजकारणातून सोयीच्या आघाड्याच आकाराला आल्या. त्याचा लाभ कुणाला होणार? याकडेच लक्ष लागले आहे.
बड्याचीवाडी गटात चौरंगी तर उर्वरित हलकर्णी, भडगाव, नेसरी व गिजवणे गटात तिरंगी लढती होत आहेत. पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष नेसरी गटाचा अपवाद वगळता सर्व जागा स्वबळावर लढवत असून नेसरी गटातील पंचायत समितीच्या दोन्ही जागा काँगे्रसला सोडल्या आहेत. मात्र, नेसरीत राष्ट्रवादीबरोबर असणारी काँगे्रस नूल व गिजवणे गटात राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहे.
जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांनी नूल गटाचा आग्रह शेवटपर्यंत सोडला नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीबरोबर त्यांचे जमले नाही. स्वाभिमानी, हत्तरकी व पताडे गटाबरोबर युती करून त्यांनी गडहिंग्लज तालुका विकास आघाडी स्थापन केली. मात्र, हत्तरकी गटाने ताराराणी आघाडीतर्फे अर्ज भरलेले उमेदवारच कायम ठेवले आहेत. त्यामुळे हत्तरकी नक्की कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिल्यांदाच भाजप जि.प.च्या ४ आणि पं.स.च्या ८ जागा लढवत आहे. उर्वरित भडगाव जि.प. आणि त्यातील भडगाव व महागाव गणाची जागा भाजपने ताराराणीला सोडली आहे. भाजपचे नेते प्रकाश शहापूरकर यांनी गिजवणे गटावरच लक्ष केंद्रीत केले आहे, तर प्रकाश चव्हाण यांनी भडगाव गटात अप्पी पाटील गटाशी युती केली आहे. मात्र, दोघांनीही समझोत्यातून दिलेले उमेदवार ताराराणी आघाडीच्या चिन्हावर लढणार आहेत.
काँगे्रसचे किसनराव कुराडे व प्रदेश सरचिटणीस सुरेश कुराडे यांनी ‘गिजवणे’वर तर गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी ‘बड्याचीवाडी’वर लक्ष केंद्रित केले असून, विद्याधर गुरबे यांनी पंचायत समितीच्या दोन जागांवर तडजोड करून ‘राष्ट्रवादी’शी ‘घरोबा’ केला आहे.
शिवसेनेच्या संग्राम कुपेकर यांनीही आपल्या नेसरी गटावरच लक्ष केंद्रित केले आहे. नेसरी व बुगडीकट्टी गणात त्यांनी सेनेचे उमेदवार दिले असून, नेसरी गटाची जागा ते स्वत: लढवित आहेत. सेनेच्या स्नेहा मोरे बड्याचीवाडी गटाची जागा लढवत आहेत.

Web Title: Gadhinglaje friendly politics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.