गडहिंग्लजकरांच्या ‘मतदानाचा सस्पेन्स’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:55+5:302021-05-03T04:18:55+5:30

गडहिंग्लज : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्याला पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एक गठ्ठा ...

Gadhinglajkar's 'suspense of voting' persists | गडहिंग्लजकरांच्या ‘मतदानाचा सस्पेन्स’ कायम

गडहिंग्लजकरांच्या ‘मतदानाचा सस्पेन्स’ कायम

Next

गडहिंग्लज : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्याला पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एक गठ्ठा मतदानासाठी दोन्ही बाजूने जोरदार रस्सीखेच झाल्याचे चित्र मतदानाच्यावेळी पाहायला मिळाले. दोन्ही आघाड्यांकडून मतदारांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न झाला. तरीदेखील गडहिंग्लजकरांच्या मतदानाचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम राहिला.

येथील एम. आर. हायस्कूलच्या मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सत्ताधारी आघाडीचे मतदार दोन ट्रॅव्हल्स् बसेसमधून, तर एकच्या सुमारास विरोधी आघाडीच्या मतदारांनी चार ट्रॅव्हल्स् बसेसमधून मतदान केंद्रावर आणण्यात आले. दरम्यान, कोरोनाबाधित पाच ठरावधारकांनी पीपीई कीट परिधान करून मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारीच्या मतदारांनी पांढऱ्या टोप्या, तर विरोधी आघाडीच्या मतदारांनी पिवळ्या टोप्या, पिवळे स्कार्प व पिवळे मास्क परिधान केले होते. सत्ताधारी आघाडीचे मतदार पहिल्यांदा हॉटेल जनाई पॅलेसमध्ये, तर विरोधी आघाडीचे मतदार स्वंयवर मंगल कार्यालयात (मंत्री हॉल) आणण्यात आले. त्या ठिकाणी अखेरची सूचना देऊन त्यांना मतदान केंद्रावर आणले.

सत्ताधारी आघाडीतर्फे उमेदवार प्रकाश चव्हाण व सदानंद हत्तरकी यांच्यासह माजी संचालक बाळासाहेब पाटील-औरनाळकर, बाळासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर, वरदशंकर वरदापगोळ, के. डी. पाटील, सातगोंडा जिन्नानावर, भैरू पाटील-वाघराळकर, राजेंद्र तारळे, रमेश रिंगणे, प्रीतम कापसे, अनिता चौगुले, विजय फुटाणे, आदींनी मतदारांना आवाहन केले.

विरोधी आघाडीतर्फे उमेदवार महाबळेश्वर चौगुले व विद्याधर गुरबे यांच्यासह जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, माजी सभापती अमर चव्हाण, सुनील शिंदे, गडहिंग्लज बाजार समिती प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई, उदय जोशी, जयसिंग चव्हाण, राजेश पाटील-औरनाळकर यांनी मतदारांना आवाहन केले.

.........

नेत्यांच्या भेटी

विरोधी आघाडीचे प्रमुख ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक, तर सत्ताधारी आघाडीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मतदान केंद्राला भेट दिली.

* सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे जावई व विद्यमान स्वीकृत संचालक रामराजे कुपेकर हे विरोधी आघाडीच्या ठरावधारकांबरोबर मतदानासाठी आले होते. त्याची विशेष चर्चा झाली. जनता दलाच्या ठरावधारकांनी स्वतंत्रपणे केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

----------------------------------------

*

गडहिंग्लज एकूण मतदान : २७३ * झालेले मतदान : २७२ * टक्केवारी : १०० टक्के

*

एका ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

----------------------------------------

* फोटो ओळी : जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीचे ठरावधारक गडहिंग्लज येथील मतदान केंद्रावर रांगेने एकत्र आले. त्यांच्यासमवेत गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, उदय जोशी, प्रकाश पताडे हेही होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक :०२०५२०२१-गड-०९

----------------------------------------

* फोटो ओळी : सत्ताधारी आघाडीचे ठरावधारक प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रांगेने मतदान केंद्रावर आले. त्यांच्यासमवेत उमेदवार सदानंद हत्तरकी, हेमंत कोलेकर, रमेश रिंगणे, राजन महाडिक हेही होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक :०२०५२०२१-गड-०८

----------------------------------------

* गडहिंग्लज तालुक्यातील खिलाडूवृत्तीचे राजकारण जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. त्याचा प्रत्यय ‘गोकुळ’च्या निवडणुकीतही आला. एकमेकांच्या विरोधात लढणारे सत्ताधारी आघाडीचे प्रकाश चव्हाण व सदानंद हत्तरकी आणि विरोधी आघाडीचे विद्याधर गुरबे व महाबळेश्वर चौगुले यांच्यात एम. आर. हायस्कूल मतदान केंद्रासमोर अशा गप्पा रंगल्या होत्या. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक :०२०५२०२१-गड-१०

Web Title: Gadhinglajkar's 'suspense of voting' persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.