गडहिंग्लजच्या रिंगरोडप्रश्नी लवकरच संयुक्त बैठक, मुश्रीफ यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 06:29 PM2021-03-13T18:29:42+5:302021-03-13T18:33:16+5:30

Hasan Mushrif Gadhinglaj kolhapur- गडहिंग्लज शहरातील प्रलंबित रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगररचना विभाग, नगरपालिका प्रशासन व संबंधित मालमत्ताधारक यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांची शिष्टमंडळाने भेटून गडहिंग्लज रिंगरोड कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले.त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्वासन दिले.

Gadhinglaj's ring road issue to be discussed soon, Hassan Mushrif testifies to Ring Road Action Committee | गडहिंग्लजच्या रिंगरोडप्रश्नी लवकरच संयुक्त बैठक, मुश्रीफ यांची ग्वाही

गडहिंग्लज येथे रिंग रोड कृती समितीतर्फे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सुनील शिंत्रे, डॉ.एम.एस.बेळगुद्री,किरण कदम,उदय जोशी,सतीश पाटील,सिध्दार्थ बन्ने,चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे गडहिंग्लजच्या रिंगरोडप्रश्नी लवकरच संयुक्त बैठकरिंगरोड कृती समितीला हसन मुश्रीफ यांची ग्वाही

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील प्रलंबित रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगररचना विभाग, नगरपालिका प्रशासन व संबंधित मालमत्ताधारक यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांची शिष्टमंडळाने भेटून गडहिंग्लज रिंगरोड कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले.त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे,गडहिंग्लज शहरातील वाहतूकीची कोंडी दुर होण्यासाठी रिंगरोड पुर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, रिंगरोडवरील कांही मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. गडहिंग्लज शहरातील मुख्य मार्गावरून संकेश्वर, निपाणी, गारगोटी, आजरा, चंदगडची वाहतूक सुरु आहे. तसेच हरळी, बेलेवाडी व गवसे कारखान्यांची उसाची वाहतूक सुरु असते.त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे.

नगरपालिकेच्या विकास आराखड्यात शहराबाहेरील वाहतूक परस्पर बाहेरून जाण्यासाठी रिंगरोडचे नियोजन आहे. परंतु, सध्या केवळ ३० टक्के रिंगरोड वापरात आहे. रस्त्यामध्ये ज्या मालमता धारकांच्या जमीनी येतात त्यातील कांहीच्या हरकती आहेत. त्यामुळे रिंगरोडच्या कामाला मर्यादा येत आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासन, रिंगरोड कृती समिती आणि संबंधित मालमत्ताधारक यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक सुनिल शिंत्रे,डॉ.एम.एस.बेळगुद्री,राजशेखर यरटे,उदय जोशी, किरण कदम, हारूण सय्यद,बाळासाहेब गुरव, विरूपाक्ष पाटणे,नागेश चौगुले,सिध्दार्थ बन्ने, बसवराज आजरी, दिलीप माने, राजेंद्र तारळे, चंद्रकांत सावंत,उदय परिट, गुंडया पाटील,महेश सलवादे,रश्मीराज देसाई, उत्तम देसाई,आदींचा समावेश होता.

गडहिंग्लज येथे रिंग रोड कृती समितीतर्फे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सुनील शिंत्रे, डॉ.एम.एस.बेळगुद्री,किरण कदम,उदय जोशी,सतीश पाटील,सिध्दार्थ बन्ने,चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
 

Web Title: Gadhinglaj's ring road issue to be discussed soon, Hassan Mushrif testifies to Ring Road Action Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.