गडमुडशिंगीने दिला सफाई कर्मचारी महिलेला गुलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:29+5:302021-01-19T04:26:29+5:30
कोल्हापूर : ज्या ग्रामपंचायतीमध्ये गेली चाळीस वर्षांहून अधिक वेळ सफाई कर्मचारी म्हणून काम केले, त्याच गडमुडशिंगी गावाने वयोवृद्ध ...
कोल्हापूर : ज्या ग्रामपंचायतीमध्ये गेली चाळीस वर्षांहून अधिक वेळ सफाई कर्मचारी म्हणून काम केले, त्याच गडमुडशिंगी गावाने वयोवृद्ध सफाई कामगार महिलेस ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी करून त्यांच्या प्रामाणिकपणाच्या सेवेचा अनोखा गौरव केला आहे. द्रौपदी रामचंद्र सोनुले असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी चक्क गावातील एका माजी सरपंचांच्या पत्नीचा पराभव केला आहे.
गावासाठी चांगले काम करतात म्हणून त्यांना गटनेते तानाजी पाटील यांनी प्रभाग क्रमांक एकमधून निवडणूकीची संधी दिली. ४१९ मते मिळवून त्या विजयी झाल्या. अनेक वर्षे गावात सफाई कर्मचारी म्हणून सेवा केल्याने त्यांचे गावात चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांना महिन्याला कसाबसा ६० रुपये पगार होता. अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या सेवेची गावकऱ्यांनीच मतांच्या रूपाने परतफेड केली आहे. गावाची झाडलोट केली, गटारे उपसली त्याच गावाने मला निवडून दिले याबद्दल त्यांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली.
फोटो : १८०१२०२१-कोल-द्रौपदी सोनुले-निवडणूक