२५ हजारांच्या लाचप्रकरणी गडमुडशिंगी मंडल अधिकारी, दोन कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:12+5:302021-09-02T04:54:12+5:30

कोल्हापूर : शेतजमिनीच्या हरकतींच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिला म्हणून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी गडमुडशिंगी सजाचे मंडल अधिकारी (सर्कल) ...

Gadmudshingi Mandal officer in bribery case of Rs 25,000, two Kotwals caught in 'bribery' trap | २५ हजारांच्या लाचप्रकरणी गडमुडशिंगी मंडल अधिकारी, दोन कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

२५ हजारांच्या लाचप्रकरणी गडमुडशिंगी मंडल अधिकारी, दोन कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Next

कोल्हापूर : शेतजमिनीच्या हरकतींच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिला म्हणून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी गडमुडशिंगी सजाचे मंडल अधिकारी (सर्कल) अर्चना मिलिंद गुळवणी (वय ४७ रा. रेसकोर्स नाका, संभाजीनगर. मूळ गाव- उत्तूर, ता. आजरा) यांच्यासह दोन कोतवालांवर बुधवारी दुपारी कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे छापा टाकून कारवाई केली. कारवाईत वसगडेचे कोतवाल तात्यासाहेब धनपाल सावंत (वय ३८ रा. वसगडे, ता. करवीर), गडमुडशिंगीचे कोतवाल युवराज कृष्णात वड्ड (वय ३५ रा. मोरे गल्ली, गडमुडशिंगी, ता. करवीर) यांचाही समावेश आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने मौजे वसगडे येथे नोव्हेबर २०२० मध्ये जमीन खरेदी केली. त्याची नोंद करण्यासाठी त्यांनी करवीर तहसीलदार कार्यालय येथे अर्ज केला. अर्जावर मूळ जमीन मालकांच्या नातेवाइकांनी हरकत घेतली. हरकतीचे प्रकरण गडमुडशिंगी मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांच्याकडे आले. त्या हरकती प्रकरणाचा निकाल द्यावा यासाठी तक्रारदार हे गुळवणी यांना भेटले. त्यावेळी त्यांनी तक्रारदारास कोतवाल तात्यासाहेब सावंत यांना भेटण्यास सांगितले. शुक्रवारी तक्रारदाराने कोतवाल सावंत यांची भेट घेतली असता, त्यांनी तुमच्या बाजूने निकाल देण्याचे काम आम्ही केले. त्यासाठी कोतवाल वड्ड व गुळवणी यांना ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांना सांगितले. याबाबत तक्रारदाराने दि, २७ ऑगस्ट रोजीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदाराच्या जमिनीच्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने दिला आहे, म्हणून कोतवाल सावंत, कोतवाल वड्ड यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती २५ हजार रुपयांची मागणी केली. या लाचेच्या मागणीस मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांनी संमती दिली. तसेच लाच रक्कम कोतवाल सावंत यांच्याकडे द्यायची असल्याचे पथकाच्या पडताळणीत निष्पन्न झाले.

त्यानुसार बुधवारी दुपारी वसगडे ग्रामपंचायतमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्वता:साठी व मंडल अधिकारी गुळवणी, कोतवाल वड्ड यांच्यासाठी घेताना कोतवाल सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत व त्यांचे पथक पो. नि. सतीश मोरे, हे. कॉ. शरद पोरे, विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने यांनी केली.

अर्चना गुळवणी यांच्या घराची झडती

अटकेनंतर पाठोपाठ मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांच्या संभाजीनगरातील निवासस्थानाची झडती पोलीस पथकाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहा. फौजदार अमर भोसले, हे. कॉ. अजय चव्हाण, नवनाथ कदम, कृष्णात पाटील यांनी घेतली. उशिरापर्यत काम सुरू होते.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-अर्चना गुळवणी (एसीबी ट्रॅप)

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-तात्यासाहेब सावंत (एसीबी ट्रॅप)

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-युवराज वड्ड (एसीबी ट्रॅप)

010921\01kol_14_01092021_5.jpg~010921\01kol_15_01092021_5.jpg~010921\01kol_16_01092021_5.jpg

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-अर्चना गुळवणी (एसीबी ट्रॅप)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-तात्यासाहेब सावंत (एसीबी ट्रॅप)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-युवराज वड्ड (एसीबी ट्रॅप)~फोटो नं. ०१०९२०२१-कोल-अर्चना गुळवणी (एसीबी ट्रॅप)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-तात्यासाहेब सावंत (एसीबी ट्रॅप)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-युवराज वड्ड (एसीबी ट्रॅप)~फोटो नं. ०१०९२०२१-कोल-अर्चना गुळवणी (एसीबी ट्रॅप)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-तात्यासाहेब सावंत (एसीबी ट्रॅप)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-युवराज वड्ड (एसीबी ट्रॅप)

Web Title: Gadmudshingi Mandal officer in bribery case of Rs 25,000, two Kotwals caught in 'bribery' trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.