गगनबावडा, पन्हाळ्यातील आठ संस्था मतदानासाठी अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:28+5:302021-03-05T04:24:28+5:30
गगनबावड्यातील २ व पन्हाळ्यातील ६, अशा ८ संस्थांचे सभासदत्व नाकारण्याचा गोकुळच्या बाजूने न्यायालयाने दिलेला निकाल विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर ...
गगनबावड्यातील २ व पन्हाळ्यातील ६, अशा ८ संस्थांचे सभासदत्व नाकारण्याचा गोकुळच्या बाजूने न्यायालयाने दिलेला निकाल विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी कायम ठेवला. या संस्था गोकुळ निवडणुकीत मतदानासाठी अपात्र ठरल्या आहेत. यात पन्हाळ्यातील यवलूज येथील सोनाबाई कोले पाटील दूध संस्था, देवठाणे येथील हनुमान सहकारी दूध संस्था, निवडे येथील हनुमान दूध संस्था, महाडीकवाडी येथील महालक्ष्मी दूध संस्था, बारीवडे येथील गणेश दूध संस्था, माळवाडी माजगाव येथील हनुमान दूध संस्था, गगनबावडा तालुक्यातील वेतवडे येथील तुळजाभवानी दूध संस्था, वेसर्डे येथील विठ्ठलाई देवी दूध संस्थेचा समावेश आहे.
राधानगरीतून सहा हरकती आल्या होत्या. डोंगळे गटाच्या तीन हरकतींची यावेळी माघार झाली. त्यामुळे आता उर्वरित तीन ठरावांची सुनावणी झाली.