गगनबावडा पंचायत समिती सभेत अधिकाऱ्यांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:30+5:302021-04-10T04:23:30+5:30
मासिक सभेस उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची सूचना देऊन संबंधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करणार असल्याचे ...
मासिक सभेस उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची सूचना देऊन संबंधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करणार असल्याचे सांगिले. तालुका कृषी विभागाच्या योजना फक्त कागदावर नको तर प्रत्यक्ष राबवा, असा प्रश्न विचारत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता अनेक योजना राबविल्या जात असल्याचा आरोप सभापती संगीता पाटील यांनी यावेळी केला. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना व स्वच्छता विभागाकडून गगनबावडा पंचायत समितीला मिळालेल्या चार संगणकापैकी दोन संगणक गेले कुठे, असा सवाल पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता डी.जी. डोंगळे यांना केला.
उपसभापती पांडुरंग भोसले यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेचे प्रस्ताव प्राप्त असताना अधिकारी त्याचा पाठपुरावा करत नसल्याचे सांगितले व ग्रामपंचायत १५ % राखीव निधी वाटप प्रत्येक गावात झाले का, याचा आढावा घेऊन ज्या ग्रामपंचातीने वाटप केले नसेल त्या ग्रामपंचायतील त्याबाबत सूचना दयाव्या, असेही सांगितले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी केले.
यावेळी सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महिला बालकल्याण विभाग यांचा आढावा घेण्यात आला.
मासिक सभेस सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, पं.स. सदस्य आनंदराव पाटील, मंगल कांबळे, बांधकाम विभाग उपअभियंता आर.जी. कुरणे, पाणीपुरवठा उपअभियंता डी.जी. डोंगळे, महिला बालकल्याण विभागाच्या मनीषा पालेकर, विस्तार अधिकारी के.ए. टोणपे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.