प्रधानमंत्री आवास योजनेत 'या' तालुक्याने मारली बाजी, राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:59 AM2022-04-28T11:59:04+5:302022-04-28T12:10:37+5:30
राज्य पुरस्कृत आवास योजनेत कागलने बाजी मारली असून, बहुमजली इमारती उभारण्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे.
कोल्हापूर : महाआवास अभियान २०२० - २१अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत गगनबावडा तालुक्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. राज्य पुरस्कृत आवास योजनेत कागलने बाजी मारली असून, बहुमजली इमारती उभारण्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून, धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर राहिला. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे.
अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी महाआवास अभियान पुरस्कार जाहीर केले.
सर्वोत्कृष्ट विभाग :प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम :- कोकण, व्दितीय - नागपूर, तृतीय - नाशिक.
राज्य पुरस्कृत आवास योजना, प्रथम - कोकण, व्दितीय - नाशिक, तृतीय - पुणे.
सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम :- गोंदिया, व्दितीय - धुळे, तृतीय - ठाणे.
राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - अहमदनगर, व्दितीय - रत्नागिरी, तृतीय - वर्धा.
सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - गोरेगाव (जि. गोंदिया), व्दितीय - गगनबावडा (जि. कोल्हापूर), तृतीय - अकोले (जि. अहमदनगर).
राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - सडक अर्जुनी (जि. गोंदिया), व्दितीय - मुक्ताईनगर (जि. जळगाव), तृतीय - कागल (जि. कोल्हापूर).
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - नाव (जि. सातारा), व्दितीय - वाडोस (जि. सिंधुदुर्ग), तृतीय - तडेगाव (जि. गोंदिया).
राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - अंबावडे (जि. पुणे), व्दितीय - अणाव (जि. सिंधुदुर्ग), तृतीय - बोरगाव (जि. चंद्रपूर).
सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - करंजेपूल (जि. पुणे), व्दितीय - देर्डे कोऱ्हाळे (जि. अहमदनगर), तृतीय - निंभी खुर्द (जि. अकोला).
राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - चिंचवली (जि. ठाणे), व्दितीय - शिरवली (जि. पुणे), तृतीय - अंदुरा (जि. अकोला).
सर्वोत्कृष्ट गृह संकुले : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - लोणी (जि. अहमदनगर), व्दितीय - येडोळा (जि. उस्मानाबाद), तृतीय - कणकापूर (जि. नाशिक).
राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - खारेकर्दुणे (जि. अहमदनगर), व्दितीय - अदासी (जि. गोंदिया), तृतीय - मुणगे (जि. सिंधुदुर्ग). मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लवकरच या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.