घुडणपीर दर्ग्यातील गलेफ विधी साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:15+5:302021-05-20T04:27:15+5:30
कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्याच्या वतीने हजरत मुबारक साहेब यांच्या उरुसानिमित्त बुधवारी रात्री पारंपरिक पद्धतीने गलेफ ...
कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्याच्या वतीने हजरत मुबारक साहेब यांच्या उरुसानिमित्त बुधवारी रात्री पारंपरिक पद्धतीने गलेफ मिरवणूक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला. गेले दोन दिवस हा उत्सव सुरू होता.
मंगळवारी रात्री घुडणपीर दर्ग्यातून तुरबतीला धार्मिक पद्धतीने गंध लावण्याच्या कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाला. पारंपरिक पद्धतीनुसार बुधवारी रात्री नऊ दर्ग्यातून मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत भवानी मंडपातील भोसलेवाडा येथे गलेफ नेण्यात आली. तेथे वाड्यातील भोेसले कुटुंबीयांनी गलेफाचे पूजन केले. यानंतर फातेहा आणि दुवा पठण करण्यात आले. यांनंतर पुन्हा भाऊसिंगजी रोडवरील घुडणपीर दर्ग्यात पोहोचली. यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव उपस्थित होते. यानंतर मुजावर कुटुंबीयांच्या हस्ते दर्ग्यातील हजरत मुबारक साहेब यांच्या तुरबतीवर गलेफ चढविण्यात आला. यावेळी फातेहा आणि दुवा पठण झाले.
याप्रसंगी अध्यक्ष लियाकत मुजावर, इकबाल मुजावर, बाबा मुजावर, कामरान मुजावर, बशीर मुजावर आदी उपस्थितीत होते.
फोटो १९०५२०२१-कोल-घुडणपीर दर्गा ऊरुस
ओळ : कोल्हापुरात शिवाजी चौकातील घडणपीर दर्ग्याच्या वतीने हजरत मुबारक साहेब यांच्या उरुसानिमित्त बुधवारी रात्री पारंपरिक पद्धतीने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गलेफ विधी करण्यात आला.
(छाया : आदित्य वेल्हाळ)