गांधीनगर वसाहत रुग्णालयाला मिळाली नवी रूग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:28+5:302021-05-29T04:18:28+5:30
गांधीनगर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची होणारी हेळसांड आणि ...
गांधीनगर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची होणारी हेळसांड आणि आर्थिक भुर्दंड थांबणार आहे. गांधीनगर, चिंचवाड, गडमुडशिंगी, उचगाव पूर्व, वसगडे, सांगवडे, रूकडी, शिरोली या परिसरातील शंभर ते दोनशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येथे येतात. त्यामध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. पूर्वीची रुग्णवाहिकाही जुनी झाली होती. त्या रुग्णवाहिकेतून प्रवास केल्यास रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा संभव होता. त्यामुळे या रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका देण्याची मागणी होत होती. त्यानुसार या रुग्णालयाला नवी रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे पूजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या पाॅल यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बीना रुईकर, डॉ. चंद्रकांत कुराडे, डॉ. वाघ, डॉ. नीलिमा पाटील, सहाय्यक अधीक्षक किशोर साळुंखे, औषध निर्माण अधिकारी खाडे, रुग्णवाहिका चालक हरी महाजन उपस्थित होते.
फोटो : २८ गांधीनगर रुग्णवाहिका
ओळ : गांधीनगर वसाहत रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका मिळाली. तिचे पूजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या पाॅल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बीना रूईकर, डॉ. चंद्रकांत कुराडे, डॉ. वाघ, वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.