गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:57+5:302021-08-17T04:29:57+5:30

गांधीनगर : गांधीनगरच्या लोकनियुक्त सरपंच रितू हरेशलाल लालवाणी यांचे पद ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रद्दबातल केले असून, पुणे विभागीय ...

Gandhinagar Sarpanch Ritu Lalwani's post canceled | गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांचे पद रद्द

गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांचे पद रद्द

Next

गांधीनगर : गांधीनगरच्या लोकनियुक्त सरपंच रितू हरेशलाल लालवाणी यांचे पद ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रद्दबातल केले असून, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंजूर केलेला आदेश कायम केला.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रितू लालवानी यांचे सरपंचपद व सदस्यत्वही रद्द केले होते. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी ग्रामविकासमंत्री यांच्या न्यायालयात अपील केले होते, ते फेटाळण्यात आले. सरपंच रितू लालवानी यांच्या कारभाराबाबत सनी प्रतापराय चंदवाणी व धीरज तेहल्यानी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यात बेकायदेशीर बांधकामाला अटकाव न करता प्रोत्साहन देणे, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून केंद्र शासनाची फसवणूक करणे, आदी गंभीर तक्रारींचा समावेश होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचा अभिप्राय पुणे विभागीय आयुक्तांना सादर केला होता. त्याची दखल घेत लालवाणी यांना सरपंच आणि सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला. या निर्णयाच्या विरोधात लालवाणी यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दाद मागितली होती. ग्रामीण विकास मंत्रालयात झालेल्या सुनावणीत पुणे विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशात कोणताही हस्तक्षेप न करता तो कायम करण्यात आला. त्यामुळे रितू लालवाणी यांचे सरपंच व सदस्य पदही पुन्हा एकदा रद्द झाले आहे.

Web Title: Gandhinagar Sarpanch Ritu Lalwani's post canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.