गांधीनगरचा घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:58+5:302021-04-02T04:23:58+5:30

गांधीनगर: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या गांधीनगरच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ...

Gandhinagar Solid Waste, Sewage Management Project Road | गांधीनगरचा घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मार्गी

गांधीनगरचा घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मार्गी

Next

गांधीनगर: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या गांधीनगरच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे गांधीनगरच्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी जयवंत उगले, सरपंच रितू ललवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधीनगर बाजारपेठेला भेडसावणाऱ्या कचरा डेपोमुळे येथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले होते. दररोज संकलित होणारा कचरा जागेअभावी स्थानिक नागरिकांच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊ लागला होता. त्यामुळे या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याची गरज होती. कचरा डेपोच्या आसपास असणाऱ्या मसोबा माळ परिसरातील नागरिकांचे व कचरा डेपो सभोवताली राहणाऱ्या कॉलनीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. त्या अनुषंगाने गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार त्याला यश आले.

दरम्यान हिंदू ॲग्रो ॲण्ड केमिकल्स व रिकार्ड इनोवेशन प्रा. लि. या दोन कंपन्याकडून गांधीनगर येथील कचरा डेपोमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प बसविण्यात येणार आहे. त्यामध्ये कचऱ्याचे वेगवेगळे विभाजन करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे. या कार्यक्रमास धीरज टेहलाणी, रोहन बुचडे ,सनी चंदवानी, गुड्डू सचदेव, हेमलता माने, विस्ताराधिकारी संदेश भोईटे, चंदन चव्हाण, दीपक जमनानी उपस्थित होते. फोटो : ०१ गांधीनगर प्रकल्प

ओळ:- गांधीनगर व्यापारीपेठेला भेडसावणाऱ्या कचरा डेपोत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीईओ संजय सिंह चव्हाण, विविध प्रशासकीय अधिकारी सरपंच रितू ललवाणी ग्रा. पं .सदस्य, व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Gandhinagar Solid Waste, Sewage Management Project Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.