दरवर्षी एकच फायबरची गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:08+5:302021-09-15T04:29:08+5:30
कोल्हापूर : गणेश उत्सवाचे स्वरूप बदलत गेल्यानंतर यातील अनेक उणिवा समोर येत गेल्या. यातील ...
कोल्हापूर : गणेश उत्सवाचे स्वरूप बदलत गेल्यानंतर यातील अनेक उणिवा समोर येत गेल्या. यातील मूळ हेतू बाजूला पडत केवळ उत्सवी स्वरूप येऊ लागले. याचा परिणाम पर्यावरण, लोकजीवन आणि अनेक बाबींवर होऊ लागला. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये विधायकता आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. याचाच एक भाग म्हणून येथील मंगळवार पेठेतील गजानन महाराज मित्र मंडळाने यंदापासून दरवर्षी नवी गणेशमूर्ती बसवण्यापेक्षा फायबरची मूर्ती करून घेतली आहे. हीच मूर्ती दरवर्षी बसवण्यात येणार आहे.
याबाबत मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रकाश कदम म्हणाले, कोरोना काळात अनेक गोष्टींवर बंधने आली. नोकरी, व्यवसाय अडचणीत आले. त्यामुळे वर्गणीवरही मर्यादा आल्या. दरवर्षी नवी मूर्ती. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्नही वाढू लागले आहेत. या सगळ्याचा विचार करून मंडळाचे उपाध्यक्ष तुषार देसाई, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश पाटील यांच्यासह सर्वच आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विचारविनिमय करून फायबरची मूर्ती करून घेण्याचा निर्णय घेतला. आता हीच मूर्ती दरवर्षी प्रतिष्ठापित केली जाणार आहे.
कार्यकर्त्याच्या गाळ्यामध्ये योग्य पध्दतीने ही मूर्ती संरक्षित पध्दतीने ठेवण्यात येईल. पुढील वर्षी पुन्हा गरज भासल्यास रंगकाम करून याच मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणामध्ये आमच्या मंडळाचा हा खारीचा वाटा असल्याचे कदम यांनी सांगितले.
१४०९२०२१ कोल गजानन महाराज मित्रमंडळ