उत्तूर येथे गणेश विसर्जन मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:28+5:302021-09-15T04:28:28+5:30
आंबेओहोळ घाटावर धुणे धुण्यासाठी, धार्मिक पूजा विधी करण्यासाठी, जनावरांसाठी पाण्याचा वापर होतो. मात्र, मार्ग बंद झाल्याने नागरिकांना कसरत करावी ...
आंबेओहोळ घाटावर धुणे धुण्यासाठी, धार्मिक पूजा विधी करण्यासाठी, जनावरांसाठी पाण्याचा वापर होतो. मात्र, मार्ग बंद झाल्याने नागरिकांना कसरत करावी लागत होती. हा मार्ग खुला करून स्वच्छ करणे गरजेचे होते. ही गरज ओळखून आज गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हसनसो मुश्रीफ फौंडेशनतर्फे कार्यकर्त्यांच्या हा मार्ग मोकळा केला. या वेळी काम चालू असताना गणेश विसर्जनासाठी काही आलेल्या नागरिकांनी कामाचे कौतुक केले, यावेळी विठ्ठल उत्तूरकर यांच्या नेतृत्वाखाली मिलिंंद काळेकर, सुधीर सावंत, संतोष लोखंडे, सतीश गाडीवडु, रमेश भेंडवळकर, ओमकार श्रेष्ठी यांनी परिश्रम घेतले. निर्मिती परिवाराने निर्माल्य ओढ्यात टाकू नये म्हणून ट्रॅक्टरची सोय केली होती. उत्तूर परिसरात शांतेतत गणेश विसर्र्जन करण्यात आले.
फोटो ओळी : चिमणे (ता. आजरा) येथे श्रींचे विसर्जनासाठी जाताना युवक.
क्रमांक : १४०९२०२१-गड-०६