गणेश आगमन मिरवणुकीत हिडीस नृत्य, किळसवाणी गाणी

By समीर देशपांडे | Published: September 20, 2023 03:54 PM2023-09-20T15:54:01+5:302023-09-20T16:05:56+5:30

शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेचे बहुतांशी मंडळांनी उल्लंघन केले होते

Ganesha's arrival procession culminates in Hidis dance, obscene songs | गणेश आगमन मिरवणुकीत हिडीस नृत्य, किळसवाणी गाणी

गणेश आगमन मिरवणुकीत हिडीस नृत्य, किळसवाणी गाणी

googlenewsNext

कोल्हापूर : शहरासह अनेक तालुक्याच्या ठिकाणी गणेश आगमन मिरवणुकीवेळीच ध्वनीयंत्रणेचा दणदणाट ऐकून नागरिकांचे कान फाटायची वेळ आली आहे. पोलिसांनी मात्र केवळ नोटीस पाठवण्याची भूमिका घेतली असून पंचनामे करून ६० दिवसांनंतर पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड क्षमतेच्या ध्वनीयंत्रणा लावल्या जातात. आता अनेक लहान मंडळे आगमन मिरवणुकीवेळीच अशा यंत्रणा वापरत असून काल, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अनेक मुख्य रस्त्यांवरून या मिरवणुका सुरू होत्या. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेचे बहुतांशी मंडळांनी उल्लंघन केले होते. 

परंतू याबाबत पोलिसांनी गडबडीने कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू यामध्ये नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. एका एका ठिकाणी तास, दीड तास कर्णकर्कश यंत्रणा लावून हिडीस नृत्य करणारे युवक विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची डोकेदुखी वाढवणार आहेत.

Web Title: Ganesha's arrival procession culminates in Hidis dance, obscene songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.