मुरगूड परिसरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:39+5:302021-09-02T04:50:39+5:30

: मुरगूड पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद मुरगूड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थोडाफार कमी झाला आहे; पण अद्यापही तिसऱ्या लाटेची शक्यता ...

Ganeshotsav in a simple manner in Murgud area | मुरगूड परिसरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव

मुरगूड परिसरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव

Next

:

मुरगूड पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुरगूड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थोडाफार कमी झाला आहे; पण अद्यापही तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून मुरगूड पोलिसांनी यंदाचाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने करा, असे आवाहन केले होते. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत तालुक्यातील ५७ गावातील बहुतांश मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवण्याचा मनोदय अनेक मंडळांनी बोलून दाखवला.

मुरगूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ५७ गावातील सार्वजनिक तरुण मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी सपोनि विकास बडवे होते. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचे देखावे, मिरवणुका किंवा डॉल्बी याला परवानगी नसल्याने उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे सांगून ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे मंडळाच्या संपूर्ण उपक्रमावर लक्ष ठेवले जाणार आहे. शक्यतो मूर्ती प्रतिष्ठापना आणि विसर्जन जागेवरच करावे. एक गाव - एक गणपती यावर भर द्यावा. मागील वर्षी ज्या गावांनी सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला होता, त्याचे अनुकरण यावेळी जास्तीत जास्त मंडळांनी करावे, असे आवाहन विकास बडवे यांनी केले.

स्वागत, प्रास्ताविक किशोरकुमार खाडे यांनी केले. यावेळी महादेव साठे बोरवडे, ओंकार पोतदार मुरगूड,अशोक चौगले मुरगूड, आकाश पाटोळे सावर्डे बुद्रुक यांनी मनोगत व्यक्त केली. सोनाळी, हसुर खुर्द, मेतके, गलगले, हनबरवाडी, अर्जुनी, खडकेवाडा या गावांनी मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केल्याबद्दल तसेच कौलगे, बेलेवाडी काळम्मा, करड्याळ, आलाबाद, बिद्री, फराकटेवाडी, बस्तवडे, चिखली या गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम रावबल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नील मोरे, नारायण देसाई, मधुकर शिंदे, सुदर्शन पाटील, आनंदा कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते. आभार कुमार ढेरे यांनी मानले.

मुरगूड पोलीस स्टेशन हद्दीतील जी मंडळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करून गावामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची कृती करणार त्यांना आपण पुढील वर्षी गणराया अवार्ड देणार आहोत तर अशा गावातील शाळेला पोलीस स्टेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्य वितरित केले जाणार असल्याचे विकास बडवे यांनी सांगितले.

फोटो ओळ

मुरगूड पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या गावात मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला, अशा गावातील मंडळांना सन्मानित करताना सपोनि विकास बडवे,पोलीस उप-निरीक्षक किशोरकुमार खाडे, कुमार ढेरे, सुनील डेळेकर,स्वप्नील मोरे,आप्पासो पोवार, आदी.

Web Title: Ganeshotsav in a simple manner in Murgud area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.