जोड... प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:19+5:302021-03-04T04:47:19+5:30
अटक केलेल्या पाचजणांपैकी अजिंक्य भोपळे याच्या कमरेला पिस्तूल मिळाले, त्यात जिवंत ४ राऊंड असल्याचे आढळले. भोपळे याच्यावर कागल येथे ...
अटक केलेल्या पाचजणांपैकी अजिंक्य भोपळे याच्या कमरेला पिस्तूल मिळाले, त्यात जिवंत ४ राऊंड असल्याचे आढळले. भोपळे याच्यावर कागल येथे स्फोट घडवून आणल्याचा गुन्हा असून त्यासाठी त्याने चार वर्षे शिक्षा भोगली आहे. तो शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्याने त्याला दोन वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यामुळे तो नवी मुंबईत राहत होता, तर दुसरा संशयित जयवंत साळवे हा कऱ्हाडमधील कुख्यात गुंड युवराज साळोखे याचा भाऊ आहे. सर्जेराव याच्यावरही मारामारीसारखे दोन गंभीर गुन्हे नोंद आहेत.
गुंडाच्या स्वागतासाठी आले, अन् दरोड्याचा कट रचला
कऱ्हाडमधील कुख्यात गुंड युवराज साळवे याची मंगळवारी कळंबा कारागृहातून सुटका झाली. त्याच्या स्वागतासाठी ही टोळी कऱ्हाडहून कोल्हापुरात आल्याचे निष्पन्न झाले. साळवे हा कऱ्हाडला गेला, तर ही टोळी कोल्हापुरात थांबून रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत होती. तोपर्यंत त्यांचा हा कट उधळला.
शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
अटक केलेल्या टोळीतील पाचही जणांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता सर्वांना शनिवार (दि. ६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
फोटो नं. ०३०३२०२१-कोल-कार(क्राईम)
फोटो नं. ०३०३२०२१-कोल-गन(क्राईम)
फोटो नं. ०३०३२०२१-कोल-तलवार(क्राईम)
फोटो नं. ०३०३२०२१-कोल-अजिंक्य भोपळे (आरोपी), जयवंत साळवे (आरोपी), दीपक आडगुळे (आरोपी), अनिल वायदंडे (आरोपी), वैभव हजारे (आरोपी) फोटो नं. ०३०३२०२१-कोल-कार(क्राईम)