प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:41+5:302021-03-04T04:47:41+5:30

कोल्हापूर : दरोडा टाकण्याच्या तयारीने मोटारीतून कोल्हापुरात आलेल्या पाच दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीला सायबर चौकात राजारामपुरी पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या सापळा लावून ...

A gang of five robbers with deadly weapons went missing | प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड

प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड

Next

कोल्हापूर : दरोडा टाकण्याच्या तयारीने मोटारीतून कोल्हापुरात आलेल्या पाच दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीला सायबर चौकात राजारामपुरी पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या सापळा लावून पकडले. या टोळीकडून मॅगझीनसह पिस्तूल, चार जिवंत राऊंड, दोन तलवारी, दोरी, बॅटऱ्या, अशा प्राणघातक शस्त्रसाठ्यासह कार जप्त करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा सायबर चौकात ही घटना घडली, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला.

अटक केलेल्या संशयितांची नावे : अजिंक्य मनोहर भोपळे (वय २८, रा. कोपरीगाव, वाशी, नवी मुंबई. मूळ गाव - चोकाक, ता. हातकणंगले, कोल्हापूर), जयवंत सर्जेराव साळवे (३६, रा. कोपर्डी हवेली, ता. कऱ्हाड, जि. सातारा), दीपक जनार्दन आडगुळे (३०, रा. वडोली रोड कोपर्डी हवेली, ता. कऱ्हाड), अनिल आनंदा वायदंडे (४९, रा. वनवडी जलविहार कॉलनी, ता. कऱ्हाड), वैभव दादासाहेब हजारे (२६, रा. विद्यानगर बनवडे फाटा, ता. कऱ्हाड).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कऱ्हाडहून कोल्हापुरात दरोडा टाकण्यासाठी काही तरुण मोटारीतून येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी पोलीस पथकासह सायबर चौकात सापळा रचला. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाकडून भरधाव वेगाने आलेली कार सायबर चौकात पोलिसांनी अडविली. यावेळी मोटारीतील दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण पोलीस पथकाने मोटारीला घेरून सर्व दरोडेखोरांना काही कळण्यापूर्वीच ताब्यात घेतले. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तूलसह प्राणघातक शस्त्रसाठा, सात हजारांची रोकड, असा मुद्देमाल सापडला. पाचही दरोडेखोरांना अटक केली. शस्त्रसाठ्यासह कार असा सुमारे सात लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जवाहरनगरात दरोडा टाकण्याच्या तयारीत

अटक केलेल्या दरोडेखोरांना ‘खाक्या’ दाखवून चौकशी केली असता त्यांनी जवाहरनगरात मोठा बंगला पाहून तेथे दरोडा टाकण्याची पूर्वतयारी केली असल्याची माहिती पुढे आली; पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला.

फोटो नं. ०३०३२०२१-कोल-कार(क्राईम)

फोटो नं. ०३०३२०२१-कोल-तलवार(क्राईम)

फोटो नं. ०३०३२०२१-कोल-अजिंक्य भोपळे (आरोपी), जयवंत साळवे (आरोपी), दीपक आडगुळे (आरोपी), अनिल वायदंडे (आरोपी), वैभव हजारे (आरोपी)

Web Title: A gang of five robbers with deadly weapons went missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.