सापळा रचून हस्तीदंत विकणाऱ्या टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:13 PM2021-03-10T20:13:56+5:302021-03-10T21:48:32+5:30
Crime News Kolhapur- कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ हस्तीदंत विकणाऱ्या टोळीला कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. याप्रकरणी तीनजणांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडील मोटार, दुचाकी, मोबाईलसह ९६५ ग्रॅम वजनाचे तीन हस्तीदंत जप्त केले आहेत.
कोल्हापूर :कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ हस्तीदंत विकणाऱ्या टोळीला कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. याप्रकरणी तीनजणांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडील मोटार, दुचाकी, मोबाईलसह ९६५ ग्रॅम वजनाचे तीन हस्तीदंत जप्त केले आहेत.
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ माणिक विलासराव इनामदार ( वय ५९, रा. परळी निनाई, ता. शाहूवाडी), सागर आबासाहेब साबळे (वय ३२, रा. माले, ता पन्हाळा), धनंजय केरबा जगदाळे (वय २१, रा. शिंगणापूर, ता करवीर) हे हस्तीदंत विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाला समजताच त्यांनी सापळा रचून या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोटार, दुचाकी, तीन मोबाईलसह ९६५ ग्रॅम वजनाचे तीन हस्तीदंत जप्त केले आहेत.
कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, साताऱ्याचे सचिन डोंबळे, वन्यजीव अपराध नियंत्रण सदस्य, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली.
बेकायदा पोपट बाळगल्याप्रकरणी कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील आरकेनगर परिसरात बेकायदा पोपट बाळगल्याप्रकरणी वन्यजीव विभागाने कारवाई केली असून दोन पोपट ताब्यात घेतले आहेत.येथील आरकेनगर परिसरात एका व्यक्तीने दोन पोपट बाळगल्याची माहिती वन विभागाला मिळाली. १९७२ च्या वन्यजीव कायद्यानुसार शेड्यूल्ड ४ प्रकारातील वन्यजीव बाळगण्यास बंदी असल्यामुळे वनविभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून सुमारे २५ हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. असे वन्यजीव बाळगू नका असे आवाहन कोल्हापूर वन विभागाचे करवीर परिक्षेत्राचे वनअधिकारी सुधीर सोनवले यांनी केले आहे.