कळंबा कारागृहात गांजा नेणाºया चालकास अटक--पोलिसांत गुन्हा : डंपरसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:11 AM2017-10-08T01:11:52+5:302017-10-08T01:12:32+5:30
कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा व मोबाईल पुरविण्याचा प्रयत्न करणाºया डंपर चालकास
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा व मोबाईल पुरविण्याचा प्रयत्न करणाºया डंपर चालकास कारागृह सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी रंगेहाथ पकडले. लक्ष्मण मल्लाप्पा धनगर (वय ३२, रा. पिराचीवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
सध्या कारागृहात शेडचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बाहेरून मुरूम आतमध्ये आणला जातो. याच संधीचा फायदा डंपरचालकाने घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ताब्यातून डंपरसह दोनशे ग्रॅम गांजा, पाच मोबाईल, बॅटरी व रोख रक्कम असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने चालकाविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी, कळंबा मध्यवर्ती कारागृहात शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारा मुरूम कारागृहात बाहेरून
चालक भांबावून गेला
कारागृहात कोणत्याही वस्तू नेता येत नाहीत. त्या चोरून नेण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा आहे. हे माहीत असतानाही लक्ष्मण धनगर घेऊन जात होता. या प्रकाराची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना समजताच त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली; परंतु त्यांने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या सूचना कर्मचाºयांना करताच तो भांबावला. साहेब, कोणी ठेवले मला माहीत नाही. सोडून द्या, अशी विनंती तो करीत होता.