गंगामाई वाचनालयाच्यावतीने सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:16+5:302021-02-17T04:29:16+5:30
आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या स्पर्धा परीक्षा विभागात अभ्यास केलेले व सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचा वाचनालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. ...
आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या स्पर्धा परीक्षा विभागात अभ्यास केलेले व सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचा वाचनालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर होते.
ग्रंथालयाचा स्पर्धा परीक्षा विभाग गेली १० वर्षे सुरू आहे. याठिकाणी अभ्यास करून अनेक युवक महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रूजू झाले आहेत. अशा गुणवंत युवकांचा सत्कार वाचनालयाच्या वतीने केला जातो, असे कार्यवाह सदाशिव मोरे यांनी सांगितले.
किरण पाटील (सिरसंगी), स्मिता पाटील (हालेवाडी), पंढरीनाथ सासूलकर (पेरणोली) यांची केंद्रीय पोलीस दलात, सुधिका पाटील (हरपवडे), संदेश पोवार (हरपवडे) यांची सीमा सुरक्षा दलात, तर श्रीधर हरेर (हत्तीवडे) यांची भारतीय नौसेनेत निवड झाल्याबद्दल वाचनालयाच्यावतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणयात आला.
युवकांनी मिळालेल्या यशावर न थांबा आपल्या गुणवत्तेवर अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन संचालक डॉ. सुधीर मुंज यांनी केले. प्रयत्न करा यश मिळणारच असे जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी सांगितले. सुभाष विभूते, किरण पाटील, सुधिका पाटील, संदेश पोवार, स्मिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपाध्यक्षा गीता पोतदार, संचालक संभाजी इंजल, इराण्णा पाटील, डॉ. अंजनी देशपांडे, वामन सामंत, महमदअली मुजावर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, सोमलिंग डांग, निखिल कळेकर, महादेव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. सदाशिव मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------
* फोटो ओळी : सैन्यदलात निवड झालेल्या सुधिका पाटील हिचा सत्कार करताना डॉ. अशोक बाचूळकर. शेजारी संभाजी इंजल, इराण्णा पाटील, डॉ. अनिल देशपांडे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १६०२२०२१-गड-०४