तेलनाडे बंधूंसह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा : एकजण ताब्यात; वीस वर्षे अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:19 AM2019-06-08T01:19:45+5:302019-06-08T01:21:29+5:30

इचलकरंजी : येथील एका महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची व मुलीला वाममार्गाला लावण्याची धमकी देत विविध ठिकाणी नेऊन वीस वर्षे ...

 Gangrape rape: Five people raped; Torture for twenty years | तेलनाडे बंधूंसह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा : एकजण ताब्यात; वीस वर्षे अत्याचार

तेलनाडे बंधूंसह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा : एकजण ताब्यात; वीस वर्षे अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देचौघांनी घरात घुसून जबरदस्ती केली व पूजेसाठी टेबलवर ठेवलेले चार ग्रॅम वजनाची कर्णफुले, एक तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्या-चांदीची अंगठी असे ५० हजार रुपयांचे दागिने घेऊन सरकार सांगतील त्याठिकाणी यायचं, अशी धमकी देत निघून गेले

इचलकरंजी : येथील एका महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची व मुलीला वाममार्गाला लावण्याची धमकी देत विविध ठिकाणी नेऊन वीस वर्षे वेळोवेळी बलात्कार केला, तर एकवेळ तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अ‍ॅड. पवन उपाध्ये, प्रशांत होगाडे यांच्यासह पाचजणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील मुख्य पोस्ट आॅफिससमोर पोवार गल्लीमध्ये राहणाऱ्या प्रशांत होगाडे याने परिसरातील महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची व ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतरही त्याने तिच्या पतीला संबंधित महिला चारित्र्यहिन असल्याचे सांगून त्या पती-पत्नीमध्ये वाद निर्माण केला. त्यानंतर डिसेंबर २००८ ते मार्च २०१९ पर्यंत संजय तेलनाडे याच्या नावाची धमकी देत वारंवार बलात्कार केला.
जानेवारी २००९ मध्ये संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, पवन उपाध्ये व ड्रायव्हर सादीक मुजावर यांनी संबंधित पीडित महिलेला जबरदस्तीने गाडीत घालून कोल्हापूर नाका परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी फिर्यादीने जोरदार आरडाओरडा केल्याने सर्वजण पळून गेले. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये आवाडे अपार्टमेंटच्या पाठीमागे असलेल्या महेश ऊर्फ सनी मेहता याच्या घरी पीडित महिला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. त्याठिकाणी तेलनाडे बंधूंसह अ‍ॅड. उपाध्ये यांनी तिला खोलीत नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.त्यानंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये दिवाळी -लक्ष्मी पूजनादिवशी प्रशांत, संजय, सुनील व पवन या चौघांनी घरात घुसून जबरदस्ती केली व पूजेसाठी टेबलवर ठेवलेले चार ग्रॅम वजनाची कर्णफुले, एक तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्या-चांदीची अंगठी असे ५० हजार रुपयांचे दागिने घेऊन सरकार सांगतील त्याठिकाणी यायचं, अशी धमकी देत निघून गेले असल्याचे संबंधित पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


तेलनाडे टोळीवर चौथा गुन्हा दाखल
नगरसेवक संजय तेलनाडे याच्यावर कोल्हापुरात मटकाप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याच्या टोळीवर शहापूर पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे व गावभाग पोलीस ठाणे या तीन ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा बलात्काराचा चौथा गुन्हा गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. एकूण संजय याच्यावर पाच व टोळीवर चार गुन्हे दाखल आहेत.

Web Title:  Gangrape rape: Five people raped; Torture for twenty years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.