Kolhapur: हातकणंगलेत गुंडांचा कामगार पुरविण्याच्या वर्चस्वातून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:39 AM2024-09-24T11:39:37+5:302024-09-24T11:39:52+5:30
पोलिसांचा खबऱ्या म्हणून होती ओळख
हातकणंगले : औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवठा करण्याच्या वर्चस्वातून काल, सोमवारी रात्री १० वा. गुंडाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून, पोटात बाटल्या खुपसून अज्ञात तिघांनी खून केला. विनायक महादेव बजयंत्री ऊर्फ कोरवी (वय ४२ रा. पाच तिकटी, हातकणंगले ) असे मृताचे नाव आहे. ही घटना इचलकरंजी रोड वरील रेल्वे भुयारी मार्गा शेजारील अध्यक्ष बिअर बार मध्ये घडली. या घटनेचा गुन्हा रात्री उशीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत हातकणंगले पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक कोरवी हा पोलिस रेकॉर्ड वरील आरोपी आहे. हातकणंगले परिसरा मध्ये त्यांची दहशत होती. गावामध्ये त्यांची गावगुंड अशी ओळख होती. शहराच्या पूर्व भागात असलेल्या औद्योगीक वसाहत मध्ये तो कामगार पूरवठा करत होता. कामगार पूरवठयावरून त्यांची नेहमी दादागिरी होती. ती मोडून काढण्यासाठीच त्यांचा वर हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी रात्री १०वा त्याला मोबाईलवर फोन करुन अध्यक्ष बिअर बार मध्ये बोलावून घेण्यात आले होते.टेबलवर बसल्या नंतर आज्ञात तीन मारेकऱ्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांचे डोक रक्तबंबाळ केले. बिअरच्या बाटल्या फोडून त्यांच्या पोटात खूपसल्या मूळे तो जाग्यावरच कोसळला तेथेच मयत झाला.
पोलिसांचा खबऱ्या म्हणून होती ओळख
- विनायक बजयंत्री हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून ही ओळखला जात होता.
- विनायकची हातकणंगले पाच तिकटी परिसरात पानटपरी होती. त्यामध्ये तो मटका घेत असल्याने त्यांच्यावर मटक्या सह चोऱ्या, मारामारी, आणि इतर गुन्हे दाखल होते.
- विनायकवर तळ कोकणामध्ये टँकरद्वारे पूरवठा होणाऱ्या रॉकेल मध्ये काळा बाजार आणि परस्पर रॉकेल विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.