Ganpati Festival -तालीम संस्था, तरुण मंडळ गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:38 PM2020-08-29T12:38:47+5:302020-08-29T12:59:32+5:30

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे आणि तालीम संस्थांच्या गणेश मंडपांचे सॅनिटायजेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही माहिती दिली.

Ganpati Festival - Training Institute, Tarun Mandal Disinfection of Ganesh Mandap | Ganpati Festival -तालीम संस्था, तरुण मंडळ गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरण

Ganpati Festival -तालीम संस्था, तरुण मंडळ गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरण

Next
ठळक मुद्देतालीम संस्था, तरुण मंडळ गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरणराहुल चिकोडे यांची माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे आणि तालीम संस्थांच्या गणेश मंडपांचे सॅनिटायजेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही माहिती दिली.

साने गुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळाच्या गणेश मंडपापासून या उपक्रमाचा शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि चिकोडे यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व लक्ष्मीटेक विकास मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत तसेच जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाचे संपूर्ण संयोजन भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई हे करीत आहेत.

यावेळी जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, राजू मोरे, सचिन तोडकर, आशिष कपडेकर, गिरीश साळोखे, सिद्धान्त भेंडवडे, किरण मुरारी उपस्थित होते.

 

Web Title: Ganpati Festival - Training Institute, Tarun Mandal Disinfection of Ganesh Mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.