कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींच्या उपस्थितीत श्री विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ
By समीर देशपांडे | Published: September 17, 2024 11:32 AM2024-09-17T11:32:06+5:302024-09-17T11:32:34+5:30
श्री गणेशाचे पूजन करून कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता प्रारंभ झाला.
समीर देशपांडे, लोकमत न्यूज् नेटवर्क
कोल्हापूर : येथील दीडशेहे वर्षाची परंपरा असलेल्या तुकाराम तालीमीच्या श्री गणेशाचे पूजन करून कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता प्रारंभ झाला. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखीतील गणेशाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
शाहू छत्रपती यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेतली आणि गणरायाचा जयजयकार करत मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल ताशांचा गजर, गणरायाचा जयजयकार करत मिरवणुक मार्गस्थ झाली.
यावेळी व्ही. बी. पाटील, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, अॅड. धनंजय पठाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यावेळी उपस्थित होते.