संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:35+5:302021-09-07T04:28:35+5:30

कोरोना झालेल्या रुग्णांची परिस्थिती कशी आहे, हे परिस्थिती पाहून कौन्सिलिंग केले जाते. जर रुग्ण चालत-फिरत असेल तर त्यांना कौन्सिलिंगचा ...

The gap of communication can worsen mental health | संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

Next

कोरोना झालेल्या रुग्णांची परिस्थिती कशी आहे, हे परिस्थिती पाहून कौन्सिलिंग केले जाते. जर रुग्ण चालत-फिरत असेल तर त्यांना कौन्सिलिंगचा खूप उपयोग होतो. जर रुग्ण गंभीर असेल. चालत-फिरत नसेल, केवळ झोपून असेल आणि अशा रुग्णांना बोलताना त्रास होत असेल तर मात्र त्यांना औषधोपचारानेच बरे करणे एक आव्हान असते.

कोरोना आजार नवीन असल्याने वैद्यकीय क्षेत्राने यावर खूप अभ्यास करून उपचाराची पद्धती निश्चित केली. रुग्णाला औषधांबरोबरच योग्य आहार व मार्गदर्शन, त्यांच्या मनातील भीती दूर करणे, सकारात्मक विचार करायला लावणे, यासाठी संवादाची प्रक्रिया सुरू ठेवणे अधिक महत्त्वाचे वाटू लागले. त्यामुळे सीपीआर रुग्णालय असो की कोविड सेंटर्स असो, या ठिकाणी रुग्णांशी संवाद साधणे आणि त्यांना कौन्सिलिंग करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमले. त्याचा परिणाम उपचारादरम्यान चांगल्या प्रकारे दिसून आला.

कोरोनाबाधित असल्याचा अहवाल ज्या दिवशी येतो, त्याक्षणी रुग्ण घाबरतो. तशा अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. जवळचे नातेवाईक सुद्धा दूर जातात. रुग्णालयातील भीतिदायक वातावरण, संवाद बंद होतो. त्यामुळे रुग्ण मानसिकदृष्ट्या अधिकच खचतो. ताणतणावातून कलह वाढतो. त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. अशा वेळी रुग्ण आणि नातेवाईक, कर्मचारी यांनी त्यांच्याशी संवाद वाढविणे आवश्यक ठरते.

चौकट -

-मन हलके करणे हाच उपाय -

रुग्णांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून सीपीआर रुग्णालयात कौन्सिलरमार्फत त्यांच्याशी संवाद साधला जातो. आजारी असताना रुग्णांचे मन हलके करण्याचा प्रयत्न केला जातो. रुग्णांजवळ मोबाईल देऊन त्यांना रोज सकाळ, संध्याकाळ जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी बोलणे करून दिले जाते. अशा फोनवरील संवादाने रुग्णांचे मन हलके होते. मनातील भीती दूर होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो तसेच त्याचे स्वास्थ्यही बिघडत नाही.

मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात....

१.

रुग्णांना दहा, पंधरा दिवस रुग्णालयात रहावे लागते. काहींना एक महिनाही रहावे लागते. अशा वेळी त्यांच्याशी जवळच्या नातेवाइकांचा संवाद घडवून आणणे फार महत्त्वाचे असते. नर्सिंग स्टाफ रुग्णांशी बोलत असतात, परंतु त्यांच्यावरदेखील मर्यादा येतात. फोनवर संवाद साधणे, वाचन करणे यामुळे रुग्णाचे स्वास्थ्य न बिघडता तो अधिक लवकर बरा होतो.

डॉ. पवन खोत, सीपीआर रुग्णालय

२.

आम्ही कोविड सेंटर्समध्ये उपचाराधीन रुग्णांना सतत सकारात्मक विचार करण्यास भाग पाडत असतो. मेडिटेशन, व्यायाम करवून घेतो. दहा दहा रुग्णांचे ग्रुप करून संवाद घडवून आणतो. एकमेकांचे चांगले, सकारात्मक विचारांचे देवाण-घेवाण करायला सांगतो. संगीताचे कार्यक्रम घेतो. कोणी गाणी म्हणत असतील तर त्यांना गायला सांगतो. सकाळी प्रार्थना घेतो. मौन धारण करायला लावतो.

डॉ. सुशांत रेवडेकर, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: The gap of communication can worsen mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.