कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण आकडेवारीत तफावत, अधिसूचना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:13 IST2025-04-05T16:12:53+5:302025-04-05T16:13:17+5:30

जिल्हा प्रशासनाकडून सुधारीत आदेश : मंगळवारी सोडत

Gap in Gram Panchayat Sarpanch Reservation Statistics in Kolhapur District Notification Cancelled | कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण आकडेवारीत तफावत, अधिसूचना रद्द

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण आकडेवारीत तफावत, अधिसूचना रद्द

कोल्हापूर : जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या १०२६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक अधिसूचनेत वाटप केलेली सरपंच पदापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणा-या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पद संख्येच्या आकडेवारीत तांत्रिक चूक झाल्याने तफावत झाली आहे. जिल्हा प्रशासनाने १ तारखेला जाहीर केलेली ही अधिसूचना रद्द केली असून त्याचा सुधारित आदेश शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे.

जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी हा आदेश काढला असून त्यात शासनाने ५ मार्च २०२५ च्या अधिसूचित आरक्षणानुसार ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण प्रमाण निश्चित केले आहे. सरपंच व महिला आरक्षण मंगळवारी (दि. ८) सोडत पद्धतीने काढण्यात येणार असून त्यासाठी तहसीलदारांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आरक्षण असे 

  • अनुसूचित जाती : १३८ पैकी ६९ महिला
  • अनुसूचित जमाती : ०७ पैकी ४ महिला
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : २७३ पैकी १३७ महिला
  • सर्वसाधारण : ६०८ पैकी ३०४ महिला
तालुका ग्रामपंचायती अनुसूचित जाती (पुरुष स्त्री) अनुसूचित जमाती (पुरुष स्त्री) नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष स्त्री) सर्वसाधारण (पुरुष स्त्री)
पन्हाळा १११ ८/८०/० १५/ १५ ३२/ ३३
शाहूवाडी १०६ ६/७ १/० १४/१४ ३२/३२
करवीर ११८ ९/१० १/० १५/१६ ३४/३३
गगनबावडा २९ ३/२ ०/० ४/४ ८/८
कागल ८३ ६/६ ०/० ११/११ २५/२४
राधानगरी ९८ ६/५ ०/० १३/१३ ३०/३१
हातकणंगले ६१ ६/६ ०/१ ८/८ १६/१६
शिरोळ ५२५/५ १/१ ७/७ १३/१३
आजरा ७३४/४ ०/० ९/१० २३/२३
भुदरगड ९७ ५/६ ०/० १३/१३ ३०/३०
गडहिंग्लज ८९ ५/५ ०/१ १२/१२ २७/२७
चंदगड १०९ ६/५ ०/१ १५/१४ ३४/३४
एकूण १०२६ ६९/६९ ३/४ १३६/१३७ ३०४/३०४
      

 

Web Title: Gap in Gram Panchayat Sarpanch Reservation Statistics in Kolhapur District Notification Cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.