कचरावेचकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:08 PM2020-11-07T12:08:25+5:302020-11-07T12:09:20+5:30
Collcatoroffice, Morcha, Garbage Disposal Issue, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचकांचा त्वरित सर्व्हे करण्यात यावा, यासह आदी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी अवनिच्यावतीने कचरा वेचक महिलांसह जिल्हधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कचरावेचकांचा त्वरित सर्व्हे करण्यात यावा, यासह आदी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी अवनिच्यावतीने कचरा वेचक महिलांसह जिल्हधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे, कचरा वेचकांची परिस्थिती हलाखीची असून कोरोनामुळे कामे करता आली नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कचरा वेचकांचा सर्व्हे करून त्यांना वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे तरीही कार्यवाही होत नाही. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अवनिच्या अनुराधा भोसले, जैनुद्दीन पन्हाळकर, आक्काताई गोसावी, भारती कोळी, संगीता लाखे आदी उपस्थित होते.