कारदग्यातील ग्रामीण साहित्य संमेलन २९ ला

By admin | Published: November 17, 2015 12:38 AM2015-11-17T00:38:59+5:302015-11-17T00:45:19+5:30

रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते

Garment Literature Conference on 29th | कारदग्यातील ग्रामीण साहित्य संमेलन २९ ला

कारदग्यातील ग्रामीण साहित्य संमेलन २९ ला

Next

हुपरी : कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून भरविण्यात येणारे २० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन २९ नोव्हेंबरला होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नाडगे व उपाध्यक्ष भगवंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, २९ नोव्हेंबरला (रविवारी) सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत सहा सत्रांमध्ये संमेलन होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सगे यांच्या हस्ते व अखिल भारतीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भीमराव गस्ती व राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा बहेनजी यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती असणार आहे. सरस्वती प्रतिमा पूजन बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा गोधाबाई गावडे आहेत. यावेळी ग्रामीण लेखक आप्पासाहेब पवार (लोकूर) यांच्या ‘पाऊलवाटा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.


दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे ‘शाश्वत ग्रामीण विकास’ या विषयावर मुक्त चिंतन होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये ‘नवी आशा, नवा उन्मेष, नवा आविष्कार’, मातीत मातीशी बोेलू काही... या सदरात नामवंत व उदयोन्मुख कवींचा सहभाग असणाऱ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.चौथ्या सत्रात महाराष्ट्र राज्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या ‘निराळं जग’ या सदरात ‘सुखी संसाराचे रहस्य’ या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Garment Literature Conference on 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.