सोमनाथ पतसंस्थेची अल्पावधीत गरुडभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:13+5:302021-08-23T04:27:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : सोमनाथ पतसंस्थेने सभासदांचा विश्वास सार्थ ठरवून अल्पावधीत गरुडभरारी घेतली आहे. ग्राहकांनी आपले दैनंदिन व्यवहार ...
लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : सोमनाथ पतसंस्थेने सभासदांचा विश्वास सार्थ ठरवून अल्पावधीत गरुडभरारी घेतली आहे. ग्राहकांनी आपले दैनंदिन व्यवहार या पतसंस्थेत सुरू करून प्रगती साधावी, असे आवाहन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
पेठवडगाव येथील सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सातव्या शाखेची सुरुवात इचलकरंजी येथे करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.
संस्था अध्यक्ष अशोक माळी म्हणाले, संस्थेने अल्पावधीत १६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. १४ कोटी रुपयांची कर्जे असून चालू वर्षात २५ लाखांचा नफा झाला आहे. एनइफटी, आरटीजीएसची सोय संस्थेत उपलब्ध आहे. जिल्हा कार्यक्षेत्रात वाढ व नवीन आठ शाखा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
स्वागत शाखा अध्यक्ष संजय गुरव यांनी केले. सूत्रसंचालन असिस्टंट जनरल मॅनेजर नागनाथ माळी यांनी केले. आभार जनरल मॅनेजर कृष्णात माळी यांनी मानले.
कार्यक्रमास उद्योगपती सतीश डाळ्या, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, प्रसाद खोबरे, माजी पंचायत समिती सदस्या रुपाली माळी, उल्हास सूर्यवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष बजरंग माळी, वसंतराव माळी, हंबीराव देसावळे, संतोष जाधव, पोपट खाडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-सोमनाथ पतसंस्थेच्या इचलकरंजी शाखेचे उद्घाटन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक माळी, रुपाली माळी, सतीश डाळ्या, अशोकराव माने, संजय गुरव, प्रसाद खोबरे उपस्थित होते.