गॅस सिलिंडर ६८ रुपयांनी महागले

By admin | Published: December 11, 2015 12:25 AM2015-12-11T00:25:13+5:302015-12-11T01:01:41+5:30

ग्राहकांच्या खिशाला चाट : सिलिंडर मिळणार सरासरी तब्बल ६५७ रुपयांना

Gas cylinder costlier by Rs 68 | गॅस सिलिंडर ६८ रुपयांनी महागले

गॅस सिलिंडर ६८ रुपयांनी महागले

Next

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरचे दर या महिन्यात ६८ रुपयांनी वाढले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना साधारण ६५७ रुपये दराने गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागणार आहे. यामधील १२३ रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार असल्याने हे सिलिंडर ग्राहकांना साधारणत: ५३४ रुपयांना मिळणार आहे.‘गॅस’चे दर हे जागतिक बाजारभावानुसार बदलत असतात. त्यानुसार गत दोन महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात गॅस दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच चाट बसून त्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. तेल उत्पादक अरब राष्ट्रांचे मंडळ (ओपेक ) जागतिक बाजारपेठेतील तेल व त्यावर आधारित उत्पादनांचे दर ठरविते. गेल्या काही दिवसांपासून अरब देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती आहे. तसेच हिवाळ्यात क्रूड आॅईलचेही भाव वाढतात. दरवाढीमागे हीच प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे.या महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या दरात ६६ रुपयांनी वाढ झाली होती. यामध्ये दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तसे निर्देश गॅस कंपन्यांकडून वितरकांना आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गॅस एजन्सीने आपल्या एजन्सीच्या दारात वाढलेल्या दराची माहिती फलकावर लिहून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या वाढीव दराने जिल्ह्यात सरासरी ६५७ रुपयांनी सिलिंडरची विक्री होत आहे. यामध्ये सुमारे १२३ रुपये शासनाचे अनुदान हे संबंधित गॅस ग्राहकाच्या बॅँक खात्यावर जमा होणार आहे. गत महिन्यात सिलिंडरचा दर ५८९ रुपये होता. त्यामध्ये या महिन्यात आतापर्यंत ६८ रुपयांनी वाढ झाली आहे.


जिल्ह्यातील गॅस वितरक व ग्राहकांची संख्या
गॅस कंपनीवितरकग्राहक संख्या
एचपीसी ३३३ लाख ४० हजार ३८३
बीपीसी१७२ लाख ९५ हजार ३६४
आयओसी१३ ७९ हजार ७९७
एकूण ६३७ लाख १५ हजार २७६


आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. त्यानुसार या महिन्यात सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. याबाबत गॅस कंपनीकडून सूचना प्राप्त झाल्या असून, त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांच्या माहितीसाठी एजन्सीमध्ये फलकावर वाढीव दराची नोंद करण्यात आली आहे. - शेखर घोटणे, अध्यक्ष,
भारत गॅस जिल्हा वितरक संघटना

Web Title: Gas cylinder costlier by Rs 68

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.